Kirron Kher | बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर यांना रक्ताचा कर्करोग, मुंबईत उपचार

बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या चंदीगडमधील खासदार किरण खेर (Kirron Kher) या रक्ताच्या कर्करोगाने (Blood Cancer) त्रस्त असून, मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Kirron Kher | बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर यांना रक्ताचा कर्करोग, मुंबईत उपचार
किरण खेर
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 11:42 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या चंदीगडमधील खासदार किरण खेर (Kirron Kher) या रक्ताच्या कर्करोगाने (Blood Cancer) त्रस्त असून, मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही माहिती त्यांच्या भाजपच्या एका सहकाऱ्याने दिली आहे. किरण खेर मल्टीपल मायलोमा आजाराने ग्रस्त आहेत, जो रक्ताच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे (Actress Kirron Kher suffering from Blood Cancer).

1973मध्ये ‘असर प्यार दा’ या पंजाबी चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या किरण खेर यांच्याबद्दल हे वृत्त ऐकताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. किरण खेर या चंदिगडच्या भाजप खासदार आहेत आणि त्या सध्या रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. किरण खेरवर सध्या मुंबईत उपचार सुरू आहेत. किरण खेर अभिनेता अनुपम खेर यांच्या पत्नी आहेत.

31मार्च रोजी प्रदेशाध्यक्ष अरुण सूद यांनी खासदार किरण खेर यांच्या अनुपस्थितीवरुन काँग्रेसने केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि यावेळी ते म्हणाले की, किरण खेर या कर्करोगाने ग्रस्त असल्याने, अनुपस्थित आहेत. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

किरण खेर यांना कर्करोगाची लागण

खासदार किरण खेर या सध्या रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त असून, मुंबईत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, म्हणूनच पुढचे काही दिवस त्या शहरात (चंदीगड) येऊ शकणार नाहीत, असे भाजप प्रदेशाध्यक्षांनी म्हटले आहे. तथापि, आता त्यांची प्रकृती अधिक स्थिर असल्याचेही सूद यांनी म्हटले आहे (Actress Kirron Kher suffering from Blood Cancer).

किरण खेर यांना मल्टिपल मायलोमा नावाचा आजार जडला आहे, जो रक्त कर्करोगाचा एक जटील प्रकार आहे. किरण यांच्यावर सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, अद्याप अभिनेत्रीच्या कुटूंबाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मदतकार्यादरम्यान जखमी

याविषयी अधिक माहिती देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, लॉकडाऊनमध्ये किरण चंदीगडमध्ये होत्या आणि त्या लोकांना मदत करत होत्या. इतकेच नव्हे तर, नोव्हेंबरमध्ये जेव्हा त्यांचा हात फ्रॅक्चर झाला, त्यानंतर त्यांच्यावर चंदीगड येथे उपचार सुरू झाले आणि त्याच वेळी तपासणी दरम्यान त्यांना मल्टिपल मायलोमा नावाचा आजार असल्याचेही आढळले.

यानंतर, त्या उपचारासाठी मुंबईला रवाना झाल्या. या आजारावर उपचार घेण्यासाठी त्यांना सतत हॉस्पिटलमध्ये जावे लागत आहे. खासदार किरण खेर यांची प्रकृती आता चांगली असल्याचे सूद यांनी सांगितले. चाहत्यांना मात्र अद्याप या गोष्टीवर विश्वास ठेवता येत नाहीय आणि आता खेर कुटुंबीयांद्वारे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती कधी दिली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

किरण खेर यांची कारकीर्द

किरण खेर यांनी 1990मध्ये हिंदी चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या ‘सरदारी बेगम’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. या चित्रपटासाठी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले. एवढेच नव्हे, तर ऋतुपर्णा घोषच्या यांच्या ‘बैरीवाली’ या बंगाली चित्रपटासाठी किरण यांना राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांत विविध भूमिकांद्वारे चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. छोट्या पडद्यावरही अभिनेत्रीने आपली छाप सोडली आहे.

(Actress Kirron Kher suffering from Blood Cancer)

हेही वाचा :

Bappi Lahiri Corona | सुप्रसिद्ध गायक-संगीतकार बप्पी लहरींना कोरोनाची लागण, मुंबईतील रुग्णालयात दाखल

Rajinikanth | ‘थलायवा’ रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, मंत्री प्रकाश जावडेकर यांची मोठी घोषणा

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.