मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन (Actress Kriti Sanon) कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त नुकतेच समोर आले होते. आता खुद्द क्रितीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे, आपल्याला कोरोना संसर्ग झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यासह तिने आपले हेल्थ अपडेटही चाहत्यांसोबत शेअर केले आहे (Actress Kriti Sanon tested positive for Corona).
क्रिती नुकतीच चंदीगडहून मुंबईला परतली होती. अभिनेता राजकुमार राव याच्यासोबत आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ती चंडीगडमध्ये होती. तिने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली होती. ज्यात तिने आपण चित्रपटाचे चित्रीकरण संपवून चंदीगडहून मुंबईला परत येत असल्याचे सांगितले होते. यासह तिने विमानातला फोटो पोस्ट करत, ‘चंदिगड बाय बाय’, असे कॅप्शन दिले होते.
कोरोनाची लागण झाल्याचे सांगताना क्रितीने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, ‘मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की, मला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. सध्या काळजी करण्याचे काहीच कारण नाही. माझी तब्येत ठीक असून, मी डॉक्टर आणि बीएमसीच्या सल्ल्यानुसार स्वत:ला क्वारंटाइन केले आहे. मी लवकरच बरी होऊन, पुन्हा कामावर परतणार आहे. तोपर्यंत मी तुमच्या सर्व शुभेच्छा वाचत आहे. मला वाटतं की त्याही खूप काम करत आहेत. तुम्ही सर्वजण सुरक्षित राहा, हा साथीचा रोग अद्याप संपलेला नाही.’ (Actress Kriti Sanon tested positive for Corona)
क्रितीच्या या पोस्टवर तिच्या इंडस्ट्रीतील मित्रांपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनीच तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता टायगर श्रॉफ यांने या पोस्टवर कमेंट करत लिहिले, ‘लवकर ठीक हो’. तर, अभिनेत्री सोफी चौधरीनेही, ‘लवकर बरे हो, खूप खूप प्रेम’, असे म्हटले आहे. निर्माती एकता कपूरने देखील क्रितीला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. क्रितीच्या या पोस्टवर काही मिनिटांतच लाखो कमेंट्स आल्या आहेत.
(Actress Kriti Sanon tested positive for Corona)
Jug Jug Jiyo | वरुण धवन, कियारा अडवाणी, नीतू कपूर ‘कोरोना पॉझिटिव्ह’? आगामी चित्रपटाचे चित्रीकरण थांबवले!https://t.co/DJVjn9vdK7@Varun_dvn @advani_kiara #JugJuggjiyo #NeetuKapoor
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 4, 2020