क्रिती सेननचा इकॉनॉमी क्लासमधून प्रवास, या छोट्याश्या कृतीने जिंकले फॅन्सचे मन

Kriti Sanon Travels By Economy Class : अभिनेत्री क्रिती सेननने अलीकडेच इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास केला आहे. अभिनेत्रीने तिच्या स्टाईलने चाहत्यांना खूप प्रभावित केले आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

क्रिती सेननचा इकॉनॉमी क्लासमधून प्रवास, या छोट्याश्या कृतीने जिंकले फॅन्सचे मन
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 3:04 PM

मुंबई : अभिनेत्री क्रिती सेननने (Kriti Sanon) इंडस्ट्रीत एक मजबूत ओळख निर्माण केली आहे. तिच्या चित्रपटांमुळे तर ती चर्चेत असतेच. पण यावेळेसअभिनेत्रीने असे काही केले आहे ज्यासाठी ती प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. खरंतर, क्रितीने अलीकडेच फ्लाइटमध्ये इकॉनॉमी क्लासमध्ये (economy class) प्रवास केला आहे. याआधीही असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी असा प्रवास केला आहे. पण क्रितीने नुसता प्रवासच नाही केला, तर त्या फ्लाइटमधील तिच्या कृतीने तिने सर्वांचे मन जिंकले. फॅन्सही (fans praise kriti) तिचे खूप कौतुक करत आहेत.

विरल भयानीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये क्रिती कशी प्रवास करत आहे ते तुम्ही पाहू शकता. मात्र, अभिनेत्रीने चेहऱ्यावर मास्क लावला आहे. पण, या स्टाईलने या अभिनेत्रीने चाहत्यांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

क्रितीच्या या स्टाइलचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. त्याचवेळी विरल भयानी यांनी क्रितीची आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती विंडो सीटवर बसलेली आहे. यादरम्यान अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर मास्क नाही. तसेच, ती तिच्या एका छोट्या चाहत्याशी बोलताना आणि मस्ती करताना दिसत आहे.

क्रिती सेननपूर्वी याआधी बॉलिवूडचे इतर आणखी काही स्टार्सनीही असा प्रवास केल्याने ते प्रसिद्धीझोतात आले आहेत. यापूर्वी दीपिका पदुकोण आणि कार्तिक आर्यन यांनीही इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास केला होता. जिथे काही लोक क्रितीचे कौतुक करताना थकत नाहीयेत. पण काही लोक असेही आहेत, जे हा व्हिडिओ पाहून अनेक जण तिला ट्रोलही करत आहेत. क्रिती तिच्या आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहे. काही काळापूर्वी तिच्या आदिपुरुष या चित्रपटाचे मोशन पोस्टरही आले आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.