Malaika Aroara Father : आभाळच कोसळलं.. वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकताच मलायका, अमृता अरोरा धावतपळत आल्या; रडतच दोघीही तोंड लपवून…
Malaika Aroara : अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं. वडिलांच्या निधनाची बातमी ऐकताच मलायका पुण्याहून ताबडतोब निघाली. तिची बहीण, अभिनेत्री अमृता अरोरा हिनेही आईच्या घरी धाव घेतली. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबालाच मोठा धक्का बसलाय.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यासाठी आजचा दिवस अतिशय दु:खद आहे. तिच्या वडीलांनी बुधवारी सकाळी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. इमारतीच्या 6व्या मजल्यावरून उडी मारत मलायकाच्या वडिलांनी आयुष्य संपवलं. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला असून ते सुन्न झाले आहेत. ही घटना समजताच मुंबई पोलिसांचे पथक त्यांच्या घरी पोहोचले असून अरोरा यांनी आत्महत्येचं हे कृत्य का केलं याचा तपास करत आहेत. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलिसांकडून इमारतीतील वॉचमन, इतर नागरिक यांची चौकशी करण्यात येत आहे.
घरी पोहोचली मलायका
बुधवारी सकाळी मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या केली. वडिलांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा मलायका मुंबईत नव्हती, ती पुण्यात होती. हे वृत्त ऐकताच ती तातडीने मुंबईच्या दिशेने निघाली. थोड्या वेळापूर्वीच ती तिच्या घरी पोहोचली. अतिशय सुन्न झालेली,रडवेली चर्या.. मलायकाने गाडीतून उतरून थेट आतमध्ये धाव घेतली. तिच्या मागोमाग तिची छोटी बहीण अमृता अरोरा हीदेखील तिच्या पतीसोबत पोहोचली होती. वडिलांचे छत्र हरपलेल्या अमृताने साश्रूनयंनानी बिल्डींगमध्ये प्रवेश केला, तिने दोन्ही हातांनी तिचा चेहरा झाकून घेतला होता.
View this post on Instagram
View this post on Instagram
मलायकाचा माजी पती अरबाजही पोहोचला
मलायका अरोरा हिचा पूर्व मती अरबाज खान हादेखील या कठीण काळात त्यांना साथ देण्यासाठी घरी पोहोचला. इमारतीच्या बाहेर पोलिस आणि इतर लोकांशी संवाद साधतानाचा अरबाद याचा व्हिडीओ काही वेळापूर्वीच समोर आला होता.
View this post on Instagram
सलीम खानही पत्नीसह मलायकाला धीर देण्यासाठी पोहोचले
मलायका-अरबाजचा घटस्फोट झाला असला तरी तिचे कुटुंबियांशी अजूनही चांगले संबंध आहेत. याचाच प्रत्यय या कठीण काळात आला. आपल्या माजी सुनेच्या आयुष्यात हा दु:खाचा दिवस आल्यावर तिला धीर देण्यासाठी अरबाजचे वडील सलीम खान तसेच सलमा खान आणि दीर सोहेल खान हेही तिच्या घरी पोहोचले. एवढेच नव्हे तर सोहेल खानची माजी पत्नी सीमा खानही तेथे आली होती.
View this post on Instagram
गेल्या वर्षी रुग्णालयात दाखल होते अनिल अरोरा
गेल्या वर्षी आरोग्याच्या काही समस्यांमुळे अनिल अरोरा यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी मलायका आणि तिची आई यांना रुग्णालयाबाहेर पाहिलं गेलं होतं. त्यावेळी अनिल यांच्यावर नेमके कोणते उपचार करण्यात आले किंवा त्यांना कशासाठी दाखल करण्यात आलं होतं, याबद्दलची माहिती समोर आली नव्हती. अनिल अरोरा हे पंजाबी हिंदू कुटुंबातील असून ते मर्चंट नेव्हीमध्ये काम करायचे.
#WATCH | DCP Crime Branch, Raj Tilak Roshan says, “Body of one Anil Mehta (62) was found. He resided on the 6th floor. We are carrying out further investigation and our team is here. We are investigating all angles in detail. Our teams are here, forensic teams are here as… https://t.co/KiCoOmjZQ8 pic.twitter.com/yN2AiVpgRb
— ANI (@ANI) September 11, 2024