Malaika Arora : अर्जुन कपूरशी ब्रेकअप झाल्यावर रिलेशनशिप स्टेटस काय ? मलायकाने थेट सांगितलं….
Malaika Arora Post : मलायकाने अरोरा तिच्या कामाप्रमाणेच तिच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असते. अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. मात्र गेल्या काही काळापासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू होत्या. त्याचत गेल्या महिन्यात अर्जुन कपूरच्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले. आता मलायकानेही तिचं रिलेशनशिप स्टेटस उघड केलंय. सध्या सर्वत्र मलायकाच्या वक्तव्याचीच चर्चा..
अभिनेत्री मलायका अरोर ही नेहमीच चर्चेत असते. प्रोफेशनल आयुष्य असो की पर्सनल, मलायकावर सतत लाईमलाइट असतो. 19 वर्षांच्या लग्नानंतर मलायकाने पती अरबाजपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांना धक्का बसला. मात्र त्यानंतर ती अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे उघड झाल्यावर तर अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यांच्या नात्याच्या बऱ्याच चर्चा होत्या. पण गेल्या काही महिन्यांपासून त्या दोघांच्या ब्रेकअपबद्दल अफवा फिरत होत्या. मलायका किंवा अर्जुन यांच्यापैकी कोणीच त्यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. सप्टेंबर महिन्यात मलायकाच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर अर्जुन सतत तिच्यासोबत खंबीरपणे उभा असल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्यांच्या नात्यात सर्व काही आलेबल असल्याचं लोकांना वाटू लागलं.
मात्र गेल्या महिन्यात दिवाळी पार्टीत अर्जुनने त्याचं सिंगल स्टेटस जाहीर केल्याने ब्रेकअपच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं. आणि त्यामुळे मलायका-अर्जुन पुन्हा चर्चेत आले. त्यानंतर मलायका अनेकवेळा सोशल मीडियावर हीलिंगशी रिलेटेड पोस्ट्स शेअर करत असते. हे कमी की काय म्हणून आता मलायकानेही तिचं रिलेशनशिप स्टेटस जाहीर केलंय. त्यासंदर्भातील तिची पोस्ट व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असलेल्या मलायका अरोराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यामध्येच तिने तिच्या स्टेटसबद्दलही खुलासा केलाय. सध्या मलायकाच्या या पोस्टची बरीच चर्चा असून ती खूप व्हायरलही झाली आहे.
काय आहे मलायकाचं स्टेटस ?
मलायकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर केली आहे. तिच्या पोस्टमध्ये लिहीलं आहे –
My Status right now :
– in a relationship
– single
– hehe
याच पोस्टमध्ये hehe यावर टीक करण्यात आली आहे. मात्र मलायकाने केवळ ही पोस्ट शेअर केली आहे,त्यासोबत काहीही लिहीलेलं नाहीये.
अर्जुनने उघड केलं होतं त्याचं स्टेटस
अभिनेता अर्जुन कपूर याने गेल्या महिन्यात दिवाळी पार्टीत त्याच्या रिलेशनशिप स्टेटसचा उलगडा केला होता. तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दिवाळी पार्टीत सहभागी झाला होता. तो बोलायला लागल्यावर अनेक जण मलायकाच्या नावाने घोषणा देऊ लागले. तेव्हा अर्जुन म्हणाला – नाही, आता (मी) सिंगल आहे, रिलॅक्स करा.
मलायका- अर्जुन रिलेशन
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर 2018 पासून एकमेकांना डेट करत होते.. सुरुवातीला दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगले पण नंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून हे नातं अधिकृतरित्या जाहीर केलं. त्यानंतर दोघेही नेहमी एकत्र दिसले. मलायका आणि अर्जुनचे एकत्र फोटो रोज सतत व्हायरल होत होते.
त्यापूर्वी मलायकाचे लग्न अभिनेता-प्रोड्युसर अरबाज खान याच्याशी झालं होतं. दोघांना अरहान हा एक मुलगाही आहे. लग्नाच्या 19 वर्षानंतर मलायका आणि अरबाज यांनी वेगळं होत असल्याची घोषणा केली होती, त्यामुळे बऱ्याच जणांना मोठा धक्का बसला होता.