Death Rumour | नव्वदच्या दशकांत चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या मीनाक्षी शेषाद्रीच्या निधनाच्या अफवा, चाहतेही हैराण!

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री (Actress Meenakshi seshadri) हीच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे.

Death Rumour | नव्वदच्या दशकांत चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या मीनाक्षी शेषाद्रीच्या निधनाच्या अफवा, चाहतेही हैराण!
मीनाक्षी शेषाद्री
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 8:13 AM

मुंबई : कोरोना महामारीमुळे सध्या बॉलिवूड सेलेब्सच्या निधनाच्या बातम्या सतत येत असतात. त्यांच्या आवडत्या सेलेब्सविषयी अशा बातम्या वाचल्यानंतर चाहते देखील अस्वस्थ होतात आणि सोशल मीडियावर त्या सेलेब्सबद्दल चर्चा करू लागतात. आता या यादीमध्ये आणखी एक अभिनेत्रीचे नाव सामील झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री (Actress Meenakshi seshadri) हीच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे. वास्तविक ती चित्रपटांच्या जगातून गायब झाल्यामुळे अशी चर्चा सुरु झाली आहे (Actress Meenakshi seshadri Death Rumours on social media).

मात्र, अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री अगदी ठीक आहे, असे सांगत फिल्म फीव्हरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिच्या आरोग्याविषयी माहिती दिली आहे. मीनाक्षी शेषाद्री यांच्या निधनाची अशी बातमी अचानक का येऊ लागली, यामागे देखील एक कारण आहे.

वास्तविक, 1 मे रोजी टीव्ही चॅनेल इंडिया टीव्हीवर, ‘तलाश एक सितारे की’ हा कार्यक्रम प्रदर्शीत झाला होता. या कार्यक्रमाचा संपूर्ण भाग 80 आणि 90च्या दशकाची सुपरहिट अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीबद्दल होता. यात तिच्या बॉलिवूड पदार्पणापासून मनोरंजन विश्वामधून अचानक गायब होण्याबद्दल अनेक गोष्टींवर चर्चा केली गेली. त्यानंतर या शोची टीम मीनाक्षी शेषाद्रीपर्यंत पोहोचण्यासाठी तिच्या कुटुंबियांसह आणि मित्रांशी बातचीत करत आहे.

चॅनलने सोशल मीडियावर या शोबद्दल पोस्ट करताच मीनाक्षी शेषाद्रीच्या चाहत्यांना वाटले की, तिचे निधन झाले आहे आणि प्रत्येक माध्यमात त्या अभिनेत्रीबद्दल चर्चा सुरु झाली (Actress Meenakshi seshadri Death Rumours on social media).

कुठे गायब आहेत मीनाक्षी शेषाद्री?

अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीने ‘पेंटर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिला चित्रपट काही विशेष जादू दाखवू शकला नाही, ज्यामुळे तिने अभिनय कारकीर्द सोडण्याचा निर्णय घेतला होता. मीनाक्षी शेषाद्रीचे खरे नाव शशीकला शेषाद्री होते. परंतु, तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी आपले नाव बदलले होते. परंतु, त्यानंतर ती ‘हिरो’ या चित्रपटात दिसली आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर त्यांनी ‘जंग’, ‘घातक’, ‘दामिनी’, ‘लव्ह मॅरेज’ सारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. या चित्रपटांमुळे मीनाक्षी बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बनली. पण ‘घातक’ या चित्रपटा नंतर तिने बॉलिवूडला निरोप दिला.

मीनाक्षीने एका बँकरसोबत लग्न केले असून, आता ती अमेरिकेत स्थायिक झाली आहे. त्यानंतर तिने बॉलिवूडला रामराम ठोकला आहे. ती सध्या अमेरिकेतील अन्य प्रकल्पांमध्ये व्यस्त आहे आणि यावेळी कोणालाही मुलाखत देण्यास नकार दिला आहे.

(Actress Meenakshi seshadri Death Rumours on social media)

हेही वाचा :

Puglya | मराठी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान, ‘पगल्या’ला तुर्की-ओन्कोमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार!

‘बिग बॉस’ स्पर्धक अभिनेत्रीच्या मनात यायचे आत्महत्येचे विचार, ‘अशा’प्रकारे केली नैराश्यावर मात!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.