Meera Joshi | सर्वात उंच महादेवाच्या मंदिरासमोर नृत्य सादरीकरण, अभिनेत्रीची थेट ‘वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद!
अभिनेत्री आणि कोरियोग्राफर असणारी मीरा सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘High Range Book Of World Records’ आणि ‘India Records’मध्ये मीरा जोशीचे नाव कोरोले गेले आहे.
मुंबई : मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशी (Actress Meera Joshi) हिने मराठी मनोरंजन विश्वात स्वःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मालिका आणि चित्रपट क्षेत्रात सक्रिय असणारी मीरा उत्तम नर्तक देखील आहे. इतकंच नव्हे तर मीराला फिरण्याची देखील खूप आवड आहे. या सगलायची सांगड घालत मीराने नुकताच एक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे (Actress Meera joshi sets a record in High Range Book Of World Records and India Records).
अभिनेत्री आणि कोरियोग्राफर असणारी मीरा सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘High Range Book Of World Records’ आणि ‘India Records’मध्ये मीरा जोशीचे नाव कोरोले गेले आहे. भारतातील सर्वात उंच मंदिरांपैकी एक असणारे, उत्तराखंडमधील तुंगनाथाचे अर्थात भगवान शिव यांच्या मंदिरासमोर नृत्य सादरीकरण करणारी पहिली अभिनेत्री म्हणून तिच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. तुंगनाथ हे जगातील सर्वात उंचावरील भगवान महादेवाचे मंदिर आहे.
मीराने स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत, या संदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे. असा विक्रम करणारी ती पहिलीच अभिनेत्री ठरली आहे.
पाहा मीराचा व्हिडीओ :
View this post on Instagram
तुंगनाथ हे उत्तराखंडमध्ये स्थित शिव मंदिर आहे. 16 मार्चला पहाटे तीनला मीराने या ट्रेकला सुरुवात केली. त्यानंतर सुर्योदयादरम्यान तिथे पोहचून तिने आपली नृत्यसेवा शिव चरणी अर्पण केली. मीराने आपल्या आई आणि भावाला या यशाचे श्रेय दिले आहे. ट्रेकदरम्यान या भागात चक्क 6 अंश सेल्सिअस तापमान होते. सर्वत्र बर्फाच्या चादरी पसरल्या होत्या. मात्र, सुदैवाने या मंदिरा पुढ्यात कमी बर्फ होता. या संधीचा फायदा घेत मीराने तब्बल २ तास नृत्य केले. नृत्याच्या आवडीने आणि भगवान शंकराच्या आशिर्वादाने हे शक्य झाल्याचे मीरा सांगते (Actress Meera joshi sets a record in High Range Book Of World Records and India Records).
मीराचे व्हिडीओ चर्चेत
मीराच्या या नृत्यसेवेची दखल ‘High Range Book Of World Records’ आणि ‘India Records’ने घेतली. हा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केल्यानंतर मीराही अतिशय आनंदित झाली आहे. यापूर्वी देखील मीराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत होता. मीराने रेल्वे कोचमधील एका रिकाम्या बोगीत ‘छैय्या छैय्यां या गाण्यावर डान्स केला होता.
कोरोनामुळे रेल्वेमध्ये अगोदरप्रमाणे गर्दी बघायला मिळत नाही आणि याचाच फायदा मीराने घेतला रेल्वेच्या एका बोगीमध्ये तिने ‘चल छैय्यां छैय्यां’ या गाण्यावर डान्स केला होता. तिने या डान्सचा व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावरून चाहत्यांसाठी शेअर केला आणि तिचा हा व्हिडीओ चाहत्यांना देखील प्रचंड आवडला होता.
(Actress Meera joshi sets a record in High Range Book Of World Records and India Records)
हेही वाचा :
Jhimma | कोरोनाचा मराठी मनोरंजन विश्वालाही मोठा फटका, बहुचर्चित ‘झिम्मा’चे प्रदर्शनही लांबणीवर!