प्रसिद्ध अभिनेत्रीला देवळात जाण्यापासून रोखलं, हिंदू असल्याचा पुरावा दे मगच..
Namitha Vankawala Faces Discrimination: प्रसिद्ध अभिनेत्री नमिता हिने मीनाक्षी अम्मन मंदिरात तिच्यासोबत घडलेल्या घटनेचा खुलासा केला आहे. या अभिनेत्रीला मंदिरात जाण्यापूर्वी हिंदू असल्याचे सिद्ध करण्यास सांगण्यात आले आणि तिला वाईट वागणूक देण्यात आली, असा दावा तिने केला आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री आणि राजकारण नमिता वांकावाला हिने सोशल मीडियावर केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे एकच खळबळ माजली आहे. तिला नुकताच असा नुभव आला,ज्यामुळे ती अतिशय भडकली आहे. ही अभिनेत्री मंदिरात जात असताना तिला जी वागणूक मिळाली, त्याबद्दल वाचा फोडत तिने तिचा रोष व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहून तिने याप्रकरणाबद्दल खुलासा केलाय. तामिळनाडूतील मदुराई येथील प्रसिद्ध मीनाक्षी मंदिरात दर्शनासाठी गेलेली असताना तिला चुकीची वागणूक मिळाल्याचा दावा तिने व्हिडीओ द्वारे केला आहे. नेमकं काय घडलं ?
मीनाक्षी अम्मन मंदिरात अभिनेत्रीसोबत झाला भेदभाव
नमिता हिने सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत आरोप केला आहे की मीनाक्षी अम्मन मंदिरात तिला आणि तिच्या पतीला आत जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. मंदिराच्या अधिकाऱ्यांनी नमिता आणि तिच्या पतीला बाहेरच थांबवून ठेवलं. एवढंच नव्हे तर हिंदू असल्याचा पुरावा तिच्याकडे मागण्यात आला, अन् अधिकाऱ्यांनी तिच्याकडे जातीच प्रमाणपत्रही मागितलं, असा दावा तिने व्हिडीओ मध्ये केला आहे. देशाच्या कोणत्याही मंदिरात मला अशा प्रकारच्या घटनेचा कधीच सामना करावा लागला नाही, असं तिने नमूद केलंय.
अभिनेत्रीकडे जात आणि धर्म प्रमाणपत्राची मागणी
या घटनेमुळे अभिनेत्री नमिता प्रचंड संतापली असून मंदिरातील अधिकाऱ्यांविरोधात त्वरित कडक कारवाई व्हावी अशी मागणी तिने केली आहे. याप्रकरणी त्वरित कारवाई करा अशी मागणी तिने मंत्री शेखर बाबू यांच्याकडे केली आहे. नमिताने तिच्या व्हिडिओमध्ये सांगितले की, सकाळी तिला आणि तिच्या पतीला मंदिरात जाण्याची परवानगी मिळाली नाही. अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून जात आणि धर्माचे दाखलेही मागितले. मंदिरात त्याच्याशी गैरवर्तन करण्यात आले, असा दावा तिने केला आहे.
View this post on Instagram
अधिकाऱ्यांकडून मिळाली चुकीची वागणूक
मंदिरात आपल्याला भेदभावाची वागणूक मिळाल्याचे तिने नमूद केलं. सर्वांना माहीत आहे की माझा जन्म हिंदू कुटुंबात झआला. लग्नही तिरुपती येथे झालं. माझ्या मुलाचं नाव देखील श्रीकृष्णाच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. तरीही मंदिरात अशा तऱ्हेची वागणूक मिळाली. मला तेथे अडवून कशाप्रकारे वागणूक देण्यात आली हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. अधिकारी आणि त्यांचे सहाय्यक यांची वागणूक अतिशय रूड, उर्मटपणाची होती.
अखेर तिने IS पोलिस टीमचे आभार मानले. त्यांच्यामुळे मला आणि माझ्या पतील सुरक्षितपणे मंदिराता जाऊन दर्शन घेता आलं, असंही तिने नमूद केलं.