मुंबईः बॉलीवूडची अभिनेत्री फक्त नूतन या नावाने ओळखली जात असली तरी नूतन बहल (Nutan Samarth Bahl) हे तिचं पूर्ण नाव. नूतनच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील (Hindi Cinema) तिच्या काही अशा गोष्टींमुळे ओळखली जाते जिने लहानपणापासून ते अगदी तिचं लग्न झाल्यानंतरही तिनं आपलं स्टारडमपण मिरवलं आहे. आणि ती नेहमीच ती चंदेरी दुनियेत चमकत राहिली. हिंदी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार नेहमीच अभिनयाबरोबच आपले स्टारडम टिकवून आहेत त्यापैकीच एक म्हणजे नूतन बहल.वयाच्या अवघ्या नवव्या वर्षीपासून चित्रपटात काम करणारी अभिनेत्री नूतनच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. ती जशी पहिली मिस इंडिया (Miss India) होती, तशीच ती चित्रपटात स्विमिंग सूट घालून सिन देणारीही धाडसी अभिनेत्री होती. अशा या अभिनेत्रीला कॅन्सर झाला आहे असं जेव्हा कळलं तेव्हा ती काम करत असलेल्या प्रत्येक दिग्दर्शकाला सांगू लागली की, शूट लवकर संपवा कारण माझ्याकडे फार कमी वेळ आहे.
मोहनीश बहलची आई आणि अभिनेत्री काजोलची मावशी म्हणजेच नूतन बहल. अभिनेत्री नूतन हिने 1950 च्या दशकात तिने एका चित्रपटात स्वीमिंग सूट घालून सिन दिला होता. हे त्या काळात खरं असलं तरी त्यापेक्षा ती तिच्या अभिनयामुळेच ती जगभर ओळखली जाते. त्या काळात तिने वेगवेगळ्या मॉडर्न लूकमध्येही आपली एक वेगळी छबी बनवली होती. अशा या अभिनेत्रीचा जन्म झाला तो दिवस होता 4 जून 1936 आणि निधन झाले ते 21 फेब्रुवारी 1991 मध्ये. तोच आज दिवस म्हणजेच त्यांचा आज स्मृतिदिन. नूतनला चित्रपटाचा वारसा असणाऱ्या कुटुंबातील होती, तिचे वडील कुमार सेन समर्थ चित्रपटांचे दिग्दर्शक तर आई शोभना समर्थ एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.
अभिनेत्री नूतन हिने 1950-60 दशकात आपल्या करियरच्या काळात अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केले आहे आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. मुंबईमध्ये 4 जून 1936 रोजी जन्मलेल्या या अभिनेत्रीने वयाच्या 9 वर्षापासूनच बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्रींच्या रांगेत तिला मान मिळाला होता.
नूतनने वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी एक अॅडल्ट फिल्म केली होती. नूतनच्या नगीना या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ए ग्रेड प्रमाणपत्र दिले आहे. हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट होता. मात्र, वयाच्या १४ व्या वर्षी नूतनला हा चित्रपट पाहता आला नाही, कारण थिएटरमध्ये जाताना तिला वॉचमनने अडवले होते अशी एक आठवण सांगितली जाते.
1950-60 च्या काळातील ही एकच अशी निवडक अभिनेत्री होती, जिने त्या काळात स्विमसूट घालून सिन दिले होते. 1958 मध्ये आलेल्या दिल्ली का ठग या चित्रपटात तिने स्विमिंग सूट घातला होता. त्या काळात या तिच्या गोष्टीची खूप चर्चा झाली, आणि त्या काळात एका महिला अभिनेत्रीनं स्विमसूट घालणे म्हणजे साधी गोष्ट नव्हती. या गोष्टीमुळे नूतन चर्चेत आली असली तरी तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक पुरस्कारही मिळवले होते. त्यावेळी फिल्मफेअरबरोबरच 1974 मध्ये तिने पद्मश्री पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता.
नूतन म्हणजे सत्तराच्या दशकातील सगळ्यात सुंदर अशी अभिनेत्री म्हणून तिची गणना होई, एवढचं नाही तर ती अशी अभिनेत्री होती जिच्या नावावर पहिला मिस इंडिया नावाचा पुरस्कार मिळाला होता.
अभिनयाच्या औपचारिक शिक्षणासाठी नूतन 1953 मध्ये स्वित्झर्लंडला गेली होती. तिथून तिने अभिनय, कथ्थक नृत्य आणि संगीताचे शिक्षण घेतले. नूतनचा आवाजही अगदीच सुरेल होता, तिच्या ‘हमारी बेटी’, ‘छबिली’ आणि ‘पेईं गेस्ट’ या चित्रपटात तिने स्वतःच्या आवाजात गाणी गायली आहेत.
आपल्या चित्रपट क्षेत्रातील यशस्वी कारकीर्दीनंतर तिने लेफ्टनंट कमांडर रजनीश बहल यांच्यासोबत तिने विवाहबंधनात अडकली. आपल्या विवाहानंतरही ती चित्रपटत क्षेत्रात सक्रिय राहिली, त्याकाळातील अनेक महिला कलाकारांनी आपल्या विवाहानंतर चित्रपटातून काम करणं थांबवलं होतं, मात्र त्या गोष्टीला नूतन मात्र अपवाद होती. लग्नानंतरही त्यांनी ‘बंदिनी’, ‘छलिया’, ‘मैं तुलसी तेरे आंगन की’, ‘देवी’, ‘सरस्वतीचंद्र’ आणि सौदागर’ अशा गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी काम करुन रसिकांची मने जिंकली होती.
जगाचा निरोप घेणाऱ्या या अभिनेत्रीचा 21 फेब्रुवारी 1991 रोजी मृत्यू झाला असला तरी त्या काळातील संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणून तिची आठवण आजही काढली जाते. नूतनचे काही चित्रपट हे तिच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन भारतीय टपाल विभागाने 2011 मध्ये नूतन यांच्यावर टपाल तिकीटाचे अनावरण केले होते.
संबंधित बातम्या
फरहानच्या लग्नात ह्रतिकने पुन्हा धरला ‘सेनोरिटा’वर ठेका; जिंदगी ना मिलेगी दोबारातील डान्स रिक्रिएट
फरहानच्या लग्नाची होणार जंगी पार्टी; दिग्गज कलाकार लावणार उपस्थिती