Priyanka Chopra Birthday | जेव्हा भरसमुद्रात निक जोनासने प्रियांका चोप्रा हिला दिला होता धक्का, अशी झाली होती हालत
बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राचा आज 41 वा वाढदिवस आहे. तिने पती निक जोनास आणि मित्र-मैत्रिणी तसेच फॅमिलीसोबत सेलिब्रेशन केले, ज्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Priyanka Chopra | ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राने तिच्या खणखणीत अभिनयाचं नाणं केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्येही वाजवलं आहे. अभिनयासोबतच ती तिच्या फॅशन व स्टाइलमुळेही नेहमी चर्चेत असते, लोकांचं लक्ष वेधत असते. प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आज 41 वाढदिवस साजरा करत आहे. याच पार्श्वभूमीवर पती निक जोनास (Nick Jonas) , फॅमिली आणि काही फ्रेंड्ससोबतचे काही जुने फोटो व्हायरल झाले आहेत.
प्रियांकाचे हे व्हायरल झालेले फोटो फ्लोरिडातील मियामी येथील असून तेथे ती पती निक जोनास आणि मित्रांसोबत मजा मस्ती करत एन्जॉय करताना दिसत आहे. बिकीनीमधील तिचा लूकही बराच व्हायरल झाला आहे. मात्र त्यातील एका फोटोकडे सर्वांचेच लक्ष वेधलं गेलं आहे. हे फोटो प्रियांकाच्या 37व्या वाढदिवसाचे होते.
View this post on Instagram
निकने प्रियांकाला समुद्रात ढकललं ?
खरंतर या फोटोंमध्ये निक आणि प्रियांका दिसत असून मजे-मजेत निकनी तिला भर समुद्रात धक्का दिल्याचे दिसत आहे. मात्र पाण्यातून बाहेर आल्यानंतर प्रियांकाने तातडीने लाइफ जॅकेट घातले. यातील काही फोटोमध्ये ती पिकं बिकीनी घालून जेट स्कीइंग करतानाही दिसत आहे.
View this post on Instagram
परिणीतीनेही दिल्या शुभेच्छा
प्रियांकाची छोटी बहीण आणि अभिनेत्री परिणीती चोप्रानेही प्रियांकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने इन्स्टा स्टोरीवर तिच्या साखरपुड्यातील प्रियांकासोबतचा एक फोटो शेअर करत आपल्या मोठ्या बहिणीला शुभेच्छा दिल्या आहेत.
यंदा पती व लेकीसह वाढदिवस सेलिब्रेट करत आहे प्रियांका
यंदा प्रियांकाचा 41वा वाढदिवस असून ती पती निक जोनास व लेक मालती मेरी जोनास हिच्यासोबत हा खास दिवस साजरा करत असल्याचे वृत्त आहे. मात्र प्रियांकाने आत्तापर्यंत कोणतेचे नवे फोटो शेअर केले नसून चाहते तिच्या सेलिब्रिशनची झलक पाहण्यास उत्सुक आहेत.