Rakhi Sawant Hospitalized : राखी सावंतला काय झालं ? हॉस्पिटलमधले फोटो व्हायरल, चाहते चिंतेत..

अभिनेत्री राखी सावंत या नावाला वेगळ्या ओळखीची गरज नाही. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे, वादामुळे ती सतत चर्चेत असते. पण यावेळी राखी वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे, कारण आहे तिचे काही फोटोज. राखीचे काही फोटो सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये ती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली दिसत्ये.

Rakhi Sawant Hospitalized : राखी सावंतला काय झालं ? हॉस्पिटलमधले फोटो व्हायरल, चाहते चिंतेत..
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 9:02 AM

अभिनेत्री राखी सावंत या नावाला वेगळ्या ओळखीची गरज नाही. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे, वादामुळे ती सतत चर्चेत असते. पण यावेळी राखी वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे, कारण आहे तिचे काही फोटोज. राखीचे काही फोटो सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये ती हॉस्पिटलमध्ये असून एका बेडवर झोपलेली दिसत्ये. तब्येत खराब झाल्यामुळे राखीला अचानाक रुग्णालयात दाखल करावे लागले. गेल्या अनेक दिवसांपासून राखी वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ती दुबईहून मुंबईत परतली होती. आता तिचे नवे फोटो समोर आले असून, ती रुग्णालयात दाखल असल्याचे वृत्त आहे. मात्र त्यामुळे तिचे चाहते चिंतेत आहेत.

रुग्णालयात दाखल राखी

पापाराझी विरल भयानी याने राखीचे काही फोटो इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट केले. रिपोर्ट्सनुसार, राखी सावंत हिला हृदयाशी निगडीत काही समस्येमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. पण तिला नेमकं काय झालंय हे अद्याप समजू शकलेलं नाही. डॉक्टरांकडून काय माहिती मिळते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ती लवकर बरी व्हावी यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. राखीच्या तब्येतीबाबत तिच्याकडून किंवा कुटुंबियांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

राखी काय म्हणाली ?

राखीला नेमकं काय झालंय हे अद्याप समजलेलं नाही, पण एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, तिला हृदयाशी निगडीत त्रास आहे. एका वृत्तवाहिनीने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, राखी म्हणाली की ती सध्या काहीच बोलू शकत नाही. रिपोर्ट्सनुसार, राखी म्हणाली की तिला 5-6 दिवसांपर्यंत आराम करण्यास सांगितले आहे.

चाहत्यांकडून राखीसाठी प्रार्थना

राखी सावंत हिचे फोटो आणि तिची अवस्था पाहून चाहतेही चिंतेत आहे. ती लवकर बरी व्हावी यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. ती कशीही वागो , ती वेगळी गोष्ट आहे, पण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची वेळ कोणावरच न येवो, असे एका युजरने लिहीलं. पण काही चाहत्यांचा तर या बातमीवर विश्वासच बसत नाहीये. काहींना तर असंही वाटतंय की हे तिचं एखादं नाटक किंवा ड्रामा असेल. आता यापुढे राखीबद्दल काय अपडेट्स मिळतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.