Rashmika Mandanna | रश्मिकाच्या नव्या लूकवर चाहते झाले फिदा, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण!

दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री रश्मिका मंदनाच्या (Actress Rashmika Mandanna) फॅन्सची यादी खूप मोठी आहे. ‘नॅशनल क्रश’ म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना आता बॉलिवूडमध्येही तिच्या अभिनयाची जादू पसरवताना दिसणार आहे.

Rashmika Mandanna | रश्मिकाच्या नव्या लूकवर चाहते झाले फिदा, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण!
रश्मिका मंदना
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 11:59 AM

मुंबई : दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री रश्मिका मंदनाच्या (Actress Rashmika Mandanna) फॅन्सची यादी खूप मोठी आहे. ‘नॅशनल क्रश’ म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना आता बॉलिवूडमध्येही तिच्या अभिनयाची जादू पसरवताना दिसणार आहे. रश्मिका ‘मिशन मजनू’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमधीलमध्ये प्रवेश करणार आहे. या चित्रपटाकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. अलीकडेच रश्मिकाने तिचा ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आहे (Actress Rashmika Mandanna share cute glamorous photo on social media).

रश्मिका मंदानाचा ‘मिशन मजनू’ हा चित्रपट आरएसव्हीपी आणि गुलिटी असोसिएशन निर्मित आहे. या चित्रपटात रश्मिकासह बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता अभिनेत्रीचा आणखी एक खास फोटो चाहत्यांना अक्षरशः वेड लावत आहे.

रश्मिकाचा ग्लॅमरस लूक

अलीकडे रश्मिकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीची ग्लॅमरस स्टाईल पाहायला मिळत आहे. या फोटोत आपण पाहू शकता की, रश्मिकाने पांढऱ्या रंगाचा अतिशय स्टायलिश ड्रेस परिधान केला आहे.

या फोटोमध्ये अभिनेत्री रश्मिका खूपच गोड दिसत आहे. फोटोमध्ये रश्मिकाच्या चेहऱ्यावरचे हास्य मनाला भुरळ घालते. रश्मिका खास तिच्या स्माईलसाठी ओळखली जाते आणि ती फोटोमध्येही छान स्माईल देताना दिसत आहे. फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘You make my heart smile- everyday!’

अभिनेत्रीचा हा फोटो सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आला आहे. तिच्या या शैलीवर चाहते पूर्णपणे घायाळ झाले आहेत. रश्मिकाच्या या फोटोवर चाहतेही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत (Actress Rashmika Mandanna share cute glamorous photo on social media).

रश्मिकाच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू

रश्मिका ‘मिशन मजनू’च्या माध्यमातून बॉलिवूडचा धमाका करणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री रॉ एजंटची भूमिका साकारत आहे, जी गुप्त मिशन राबवण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाते. अलीकडेच रश्मिकाने चाहत्यांना चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्याची माहिती दिली आहे. यासंदर्भात पोस्ट शेअर करताना रश्मिकाने इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘मिशन मजनू’मुळे मी पुन्हा एकदा उत्साहित झाले आहे आणि थोडीशी नर्व्हस देखील आहे. ही माझी डेब्यू फिल्म असणार आहे. मी या चित्रपटाचा एक भाग आहे, याचा मला खूप आनंद झाला आहे.

रश्मिका मुंबईत शिफ्ट झाली!

मिशन मजनू आणि इतर बॉलिवूड प्रोजेक्ट्सच्या तयारीसाठी रश्मिका मुंबई ते हैदराबाद दरम्यान धावपळ करत होती. मात्र, आता तिला मुंबईत स्वतःचा नवीन पत्ता सापडला आहे. रश्मिकाने मुंबईत घर घेतले आहे. रश्मिकाने हैदराबादच्या घरातून काही सुंदर वस्तू आपल्या मुंबईतल्या नवीन घरी आणल्या आहेत.

यापूर्वी जेव्हा ती मुंबईत यायची तेव्हा हॉटेलमध्येच राहायची. पण, रश्मिका मुंबईमुळे इतकी प्रभावित झाली की, तिने येथे फ्लॅट घेतला. त्याचवेळी दक्षिण सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदनाच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा झाली. हा चित्रपट 13 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होईल. दिग्दर्शक सुकुमार हे त्याचे लेखक आहेत. हा चित्रपट तेलगू, तामिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

(Actress Rashmika Mandanna share cute glamorous photo on social media)

हेही वाचा :

PHOTO | चंद्रकला पैठणीत खुललं अप्सरेचं सौंदर्य, पाहा सोनाली कुलकर्णीचा नवा लूक!

Adipurush | ‘बाहुबली’ प्रभासच्या चित्रपटात ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची एंट्री, साकारणार महत्त्वाची भूमिका!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.