भरतनाट्यम सादर करणारी ‘ही’ तरुणी इंटरनेटवर चर्चेत, सौंदर्यासह नृत्य कौशल्याचेही कौतुक!
या चर्चित व्हिडीओमध्ये एक तरुणी घराबाहेर उभी राहून अंगणातील मोकळ्या भागात अभिजात संगीतावर भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य सादर करताना दिसत आहे.
मुंबई : आतापर्यंत आपण इंटरनेटवर बर्याच प्रकारचे नृत्य व्हिडीओ पाहिले असतील, परंतु या शास्त्रीय नृत्यांगनेने आपल्या अनोख्या नृत्य शैलीने सर्वांचेच मन जिंकले आहे (Rukmani Vijyakumar Video Viral). तिच्या हा नृत्य व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे. तसेच या व्हिडीओचे व्हुज देखील झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो वेळा पाहिला गेला आहे (Actress Rukmani Vijyakumar’s bharatnatyam dance video gone viral on twitter).
नृत्य मुद्रांनी चाहते घायाळ…
या चर्चित व्हिडीओमध्ये एक तरुणी घराबाहेर उभी राहून अंगणातील मोकळ्या भागात अभिजात संगीतावर भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य सादर करताना दिसत आहे. या नृत्यात तिने तिच्या कठोर नृत्य मुद्रांतून या संगीतामागील छुपी कथा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या सराईत नृत्य मुद्रा नृत्यांगनेच्या अनेक वर्षांच्या सरावाचे वर्णन करीत आहेत. हे नृत्य सादर करताना या तरुणीने भरतनाट्यम वेशभूषा स्टाईलमध्ये साधी गोल्डन साडी परिधान केली आहे. आणि या लूक सोबत तिने साध्या दागिन्यांसह, हलका मेकअप परिधान केला आहे (Actress Rukmani Vijyakumar’s bharatnatyam dance video gone viral on twitter).
Her saree ,her hairstyle nd those moves ? pic.twitter.com/xCZ4bp2NwA
— vaidehi singh (@vaidehi_sing) December 7, 2020
(Actress Rukmani Vijyakumar’s bharatnatyam dance video gone viral on twitter)
या तरुणीचा हा नृत्य व्हिडीओ 7 डिसेंबर रोजी वैदेही सिंह नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना यासह कॅप्शनवर लिहिले आहे की, ‘तिच्या डान्स मूव्हजबरोबरच तिची साडी आणि हेअरस्टाईलही खूप सुंदर आहे’.
जगभरातून कौतुकाचा वर्षाव
लोक या डान्स व्हिडीओचा खूप आनंद घेत आहेत. या व्हिडीओवर आतापर्यंत 1 लाख 46 हजार व्हूव झाले आहेत. तसेच, लोक या व्हिडीओवर कमेंट करून या तरुणीच्या नृत्य कौशल्याचे भरभरून कौतुकही करत आहेत. एका वापरकर्त्याने या व्हिडीओवर कमेंट करत या तरुणीविषयी माहिती दिली आहे. ‘या तरुणीचे नाव रुक्मणी विजयकुमार असून, ती एक प्रसिद्ध अभिनेत्री देखील आहे. आणि ही तरुणी बंगळुरुच्या कोरोमंगला येथे नृत्य वर्ग चालवते’, असे या वापरकर्त्याने म्हटले आहे.
(Actress Rukmani Vijyakumar’s bharatnatyam dance video gone viral on twitter)
PHOTO | ना अभिनेत्री, ना मॉडेल, तरीही सोशल मीडियावर आमिर खानच्या लेकीची चर्चा!https://t.co/Sesk9Ylag3@irakhanofficial #IraKhan #entertainmentnews
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 10, 2020