शाहिद करीनाच्या मिठी मारण्यावर सई ताम्हणकरची प्रतिक्रिया; म्हणाली ‘हे नातेसंबंध…’
शाहिद कपूर आणि करीना कपूर यांची आयफा पुरस्कार सोहळ्यातील भेट चांगलीच चर्चेत आहे. त्यांच्या एकत्रित उपस्थितीने चाहत्यांना आनंद झाला आहे दरम्यान याबद्दल आता सई ताम्हणकरनेही व्यक्तव्य केलं आहे. करीना-शाहिदने पुन्हा एकत्र येणं तसेच मंचावर पुन्हा प्रेमाने मिठी मारणं यावर सईने आपलं मत व्यक्त केलं आहे.

बॉलिवूडमध्ये अफेअर, घटस्फोट वैगरे या गोष्टी अगदीच सामान्य आहे. त्याबद्दल वारंवार चर्चाही होत असते. पण काही प्रसंग किंवा किस्से मात्र बराच काळ चर्चेत राहतात. त्यातीतल एक किस्सा म्हणजे अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री करीना कपूर यांची बऱ्याच वर्षांनंतर झालेली भेट. ज्याची चर्चा होतच आहे. त्या दोघांमध्ये झालेल्या मैत्रीमुळे चाहत्यांनाही आनंदच झाला.
ब्रेकअपनंतर करीन-शाहिदची मैत्री पुन्हा चर्चेत
अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री करीना कपूर एकाच मंचावर दिसून आले. काही आठवड्यांपूर्वीच पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये शाहिद आणि करीना एकाच स्टेजवर बाजूबाजूला उभे राहून गप्पा मारता दिसले. दोघेही अगदी जवळच्या मित्र-मैत्रिणींप्रमाणे हसत खेळत एकमेकांशी बोलत होते. ब्रेकअपनंतर या दोघांची मैत्री पुन्हा एकदा सार्वजनिक मंचावर दिसून आली. त्यामुळेच आयफाच्या स्टेजवरील हे क्षण सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहेत. दोघांच्या ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच हे दोघे अशाप्रकारे सार्वजनिक मंचावर सोबत दिसून आल्याने चांगलीच चर्चा झाली.
“या अशा गोष्टी फार खासगी….”
या जोडीने पुन्हा एकदा चित्रपटांमध्येही एकत्र यावं अशी चाहत्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच या दोघांच्या एकत्र येण्यासंदर्भात मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने देखील तिची प्रतिक्रिया दिली आहे. सईला एका मुलाखतीत शाहिद आणि करीनाने एका सोहळ्यात एकमेकांना मिठी मारल्यासंदर्भात, त्यांच्या मैत्रीसंदर्भात तिचं मत विचारलं गेलं त्यावर तिने म्हटलं की,” या अशा गोष्टी फार खासगी असतात. आधीच्या नातेसंबंधांवर या भावना अवलंबून असतात,’ असं सईने म्हटलं आहे.
सई देखील या दोघांची खूप मोठी फॅन
सई देखील या दोघांची खूप मोठी फॅन आहे म्हणून दोघांना पुन्हा असं एकत्र पाहणं म्हणजे तिच्यासाठीही हा सुखावणारा क्षण असल्याचं तिने म्हटलं. एक प्रेक्षक म्हणून या दोघांना एकत्र पाहून फार आनंद झाला आणि हे दोघे पुन्हा एकत्र काम करतील अशी अपेक्षाही सईने व्यक्त केली आहे. या दोघांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री फारच जबरदस्त असल्याचं मतही सईने व्यक्त केलं आहे.
या जोडीला पुन्हा पडद्यावर पाहण्याची इच्छा
शाहिद आणि करीना एकमेकांना पाच वर्ष डेट करत होते. जब वी मेट चित्रपटामधील दोघांचा अभिनय आणि जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मात्र 2004 ते 2009 दरम्यान एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांमध्ये मतभेद झाले आणि ते वेगळे झाले. दरम्यानच्या काळातच 2007 साली जब वी मेट प्रदर्शित झाला होता. तर 2008 मध्ये टशन चित्रपटाच्या शुटींगदरम्यान करीना आणि सैफ अली एकमेकांच्या जवळ आल्याचं बोललं जातं आणि हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे करीना आणि सैफ 2012 साली विवाहबंधनात अडकले.
मात्र करीना शाहिदची जोडी आता खऱ्या आयुष्यात तर नाही पण किमान पडद्यावर तरी पुन्हा एकत्र आलेली, तसेच पडद्यावर यांचा रोमान्स पुन्हा पाहायला मिळावा अशी चाहत्यांची इच्छा आहे.