Oops Moment : ऊप्स… शर्लिन चोप्राला ड्रेस सावरताना आले नाकीनऊ, Video पाहून युजर्सनेही फटकारले

| Updated on: May 24, 2023 | 9:03 AM

बॉलिवूडमधील अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शर्लिनला तिच्या कपड्यांमुळे ट्रोल केले जात आहे.

Oops Moment : ऊप्स... शर्लिन चोप्राला ड्रेस सावरताना आले नाकीनऊ, Video पाहून युजर्सनेही फटकारले
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई : चर्चेत कसं रहायचं हे काही सेलिब्रिटींनी व्यवस्थित माहीत असतं. काही बेधडक वक्तव्य, अतरंगी कपडे अशामुळे अनेक सेलिब्रिटी लाईमलाइटमध्ये असतात. बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हीदेखील कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. शर्लिन अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे नवनवे वाद निर्माण करते. याशिवाय तिच्या रिव्हिलिंग आउटफिट्समुळे ती नेहमीच यूजर्सच्या निशाण्यावर असते. दरम्यान, शर्लिन चोप्राचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. जिथे फॅशनच्या नादात अभिनेत्रीला ऊप्स मोमेंटचा सामना करावा लागला.

खरंतर शर्लिन चोप्राला मुंबई विमानतळावर कॅप्चर करण्यात आले. जिथे ती लूज पँट आणि मॅचिंग ब्रालेस क्रॉप टॉप घालून पोहोचली. या आउटफिटमध्ये ती किती अनकम्फर्टेबल होती, हे हा व्हिडिओ पाहून स्पष्टपणे दिसून येते. शर्लिन वारंवार तिचा क्रॉपटॉप ठीक करताना दिसली. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव, ऊप्स मोमेंटही कॅमेऱ्यांपासून सुटू शकले नाहीत. मात्र, शर्लिनने कॅमेरासमोर तिचा पूर्ण आत्मविश्वास दाखवला.

 

मात्र सोशल मीडिया यूजर्सनी शर्लिन चोप्राला या लूकवरून फटकारले आहे. विमानतळावर जाताना असे कपडे घालण्याची काय गरज आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. फोटोशूट, एखादा इव्हेंट किंवा फिल्म्स दरम्यान असे कपडे घालावे लागतात हे समजू शकते. पण रोजच्या आयुष्यात, बाहेर जाताना असे कपडे परिधान करण्याची काय गरज आहे, असा सवालही एका युजरने केला. तर काही लोकांनी शर्लिनची तुलना राखी सावंतशीही केली आहे. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, मॅडमला (नीट) कपडे घालायला लाज वाटते.

कृपया असे कपडे घालू नका, अशी विनंतीही एका युजरने केली आहे. 14 एप्रिल रोजी शर्लिन चोप्रा मुंबईतील एका फायनान्सरविरुद्ध जुहू पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर चर्चेत आली होती. त्या व्यक्तीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा शर्लिनने आपल्या तक्रारीत केला होता. मात्र या विधानासोबतच तिने असेही सांगितले होते की ती व्यक्ती शर्लिनला एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम देणार होती.