Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shilpa Shetty Accident: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा अपघात, व्हील चेअरवरून घरी, हाताला मार अन् पायाला फ्रॅक्चर

शिल्पाने तिच्या अपघाताचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. शिल्पाने हॉस्पिटलमधील एक फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये शिल्पा हसताना दिसत आहे. पण, या फोटोत तिच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे दिसत आहे. दुखापत झालेला पाय घेऊन ती व्हीलचेअरवर बसलेली आहे.

Shilpa Shetty Accident: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा अपघात, व्हील चेअरवरून घरी, हाताला मार अन् पायाला फ्रॅक्चर
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 7:30 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा अपघात(Shilpa Shetty Accident) झाला आहे. शिल्पा शेट्टीच्या पायाला दुखापत झाली आहे. तिच्या पायाला फ्रॅक्चर करण्यात आले आहे. तर तिच्या हाताला देखील दुखापत झाली आहे. सोशल मीडियावर तिने एक फोटो शेअर करत अपघाताची माहिती दिली आहे. या फोटोत शिल्पा व्हिल चेअरवर बसलेली दिसत आहे. मात्र, या फोटोमधील तिची स्माईल चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. शिल्पा हसत मुखाने या अपघाताचा सामना करत असल्याचे या फोटोवरुन दिसत आहे.

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा इंस्टाग्रामवरील सर्वात फेमस सेलिब्रिटींपैकी एक आहे. तिच्या अनेक अॅक्टीव्हींसह तिच्या फिटनेस रूटीनपर्यंतचे सर्व अपडेट शिल्पा सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने आता तिच्या अपघाताचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. शिल्पाने हॉस्पिटलमधील एक फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये शिल्पा हसताना दिसत आहे. पण, या फोटोत तिच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे दिसत आहे. दुखापत झालेला पाय घेऊन ती व्हीलचेअरवर बसलेली आहे. या फोटोत शिल्पाचा डेनिम-ऑन-डेनिम लूक पहायला मिळत आहे. शिल्पा शेट्टीच्या पायाला दुखापत झाली असली तरी शिल्पाने हसत हात वर करून फोटोसाठी पोझ दिली आहे. यात तिच्या हाताच्या तळव्याला बँडेज असल्याचे दिसत आहे. शिल्पाच्या चेहऱ्यावर फक्त हसूच नाही तर तिने तिच्या फोटोला दिलेले कॅप्शनही पॉझिटीव्ह आहे. रोल कॅमेरा अॅक्शन घेतला – ‘ब्रेक अ लेग!’ असं म्हणत तिने अपघात सांगीतल्याचे सांगीतले आहे.

6 आठवडे शूटींग बंद

मी 6 आठवडे शुटींग करु शकत नाही. पण मी लवकरच ठणठणीत बरी होऊन पुन्हा त्याच जोमाने काम करेन. तोपर्यंत दुवाँ ओ मे याँद रखना… चाहत्यांनी केलेल्या प्रार्थना नेहमीच पाठीशी उभ्या राहतात असे म्हणत तिने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

लवकरच OTT वर पदार्पण करणार

टीव्ही आणि बॉलिवूडनंतर शिल्पा शेट्टी लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पदार्पण करणार आहे. रोहित शेट्टीच्या ‘कॉप युनिव्हर्स’च्या माध्यमातून शिल्पा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. शिल्पा तिच्या ओटीटी पदार्पणाबद्दल खूप उत्साहित आहे. छोट्या पडद्यावरील ती एक सेलिब्रिटी जज आहे. जज म्हणून तिने खूप लोकप्रियता मिळवली आहे. तिने सोनी टीव्हीवरील सुपर डान्सर या डान्स रिअॅलिटी शोला जज केले आहे. या शोचे चार सीझन पूर्ण झाले आहेत. अलीकडेच शिल्पाने ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या टॅलेंट रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून काम केले.

कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला.
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा.
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला.
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी.
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.