त्याच्या सरळ कानाखाली वाजवली… स्नेहा वाघने सांगितला आईचा तो किस्सा, नेमक काय घडलं होतं ?
अभिनेत्री स्नेहा वाघचा नवा शो नीरजा हा नुकताच सुरू झाला आहे. या शोमध्ये ती एका स्ट्राँग, खंबीर आईची भूमिका निभावताना दिसणार आहे.
Sneha Wagh : मराठी व हिंदी मालिकांमधील एक प्रसिद्ध चेहरा म्हणजे अभिनेत्री स्नेहा वाघ (Sneha Wagh) . तिचा एक नवा शो ‘नीरजा-एक नई पहचान’ हा सुरू झाला असून त्यात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या शोमध्ये ती एका खंबीर, स्ट्रॉंग आईचा रोल निभावताना दिसणार आहे. याच शो संदर्भातील मुलाखतीदरम्यान स्नेहा तिच्या आईबद्दलही बोलत होती. तेव्हा तिने तिच्या आईच्या बहाद्दुरीचा एक किस्सा सांगितला.
जेव्हा तरूणाने काढली होती स्नेहाची छेड
एका मुलाखतीदरम्यान स्नेहाने तो किस्सा सांगितला. ‘ एकदा एका मुलाने माझ्याशी गैरवर्तन केले होते. माझ्या आईने येऊन त्याला संपूर्ण कॉलेजसमोर जोरात थप्पड लगावली होती. मी तेव्हा खूपच लहान होते आणि अशा वेळेस कसं वागायचं ते मला माहीत नव्हतं. मी त्या घटनेबद्दल आईला काहीच सांगितलं नाही पण कुठून तरी तिला कळलं. ती सरळ कॉलेजमध्ये आली आणि मला येऊन तिने विचारले कोण आहे तो मुलगा ? त्याला माझ्यासमोर आण. तो मुलगा समोर आल्यावर आईने त्याला जोरदार थप्पड लगावली. ते पाहून मला खूप बळ मिळालं’ अशा शब्दात स्नेहाने तिचा अुनभव सांगितला.
आईसोबत सेटवर जायची स्नेहा
स्नेहा तिच्या आईसोबत कामावरही जायची. ‘मी खूप लहान असताना माझी आई मला सेटवर घेऊन जायची. मी १८-१९ वर्षांची झाल्यावर तिने मला तिथे नेणं बंद केले. ती माझ्यासाठी जेवणही बनवायची. कारण मला बाहेरचे जेवण फारसे आवडत नाही. मला अजूनही आठवतं की ती मला सकाळी ७ ते ८ या वेळेत प्रॅक्टिकलला घेऊन जायची. आणि मग आम्ही सेटवर जायचो, अशी आठवण स्नेहाने सांगितली.
‘नीरजा-एक नई पहचान’ या शोमध्ये अभिनेत्री काम्या पंजाबीसुद्धा दिसणार आहे.