'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतील कलाकारांनी साकारलेली विविधं पात्रं प्रेक्षकांची आवडती झाली आहेत.
या मालिकेत जशी सासू-सूनेची, आई-मुलाची जोडी प्रसिद्ध आहे, तशीच शुभ्रा आणि ‘बबड्या’ अर्थात सोहमची जोडीही प्रसिद्ध आहे.
ऑनस्क्रिन शुभ्रा आणि सोहम यांचं पटत नसलं तरी, ऑफस्क्रिन मात्र तेजश्री आणि आशुतोषमध्ये चांगली मैत्री आहे.
सोहमच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता आशुतोष पत्की आणि शुभ्राच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हे दोन्ही कलाकार खऱ्या आयुष्यात चांगले मित्र आहेत.
आशुतोष पत्कीच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच तेजश्रीनेही त्याला सोशल मीडियावर खास शुभेच्छा दिल्या आहेत.
तेजश्रीने आशुतोषसोबतचा फोटो शेअर केला आहे. ‘कधी तू माझा मित्र असतोस, तर कधी गाईड’, असे म्हणत तिने आशुतोषला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.