कोई नहीं ते अपनी कहानी… कॉफी, रस्ते, झरे, डोंगरदऱ्या… वैभवीचा शेवटचा काळीज हेलावणारा व्हिडिओ पाहिला का?

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्यायच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. फिरायला गेलेली असताना झालेल्या कार अपघातात तिचा जीव गेला.

कोई नहीं ते अपनी कहानी... कॉफी, रस्ते, झरे, डोंगरदऱ्या... वैभवीचा शेवटचा काळीज हेलावणारा व्हिडिओ पाहिला का?
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 3:59 PM

मुंबई : मृत्यूचा काहीच भरोसा नाही. कधी येऊन कोणाला घेऊन जाईल ते कळत नाही. आदित्या सिंग राजपूतनंतर टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्यायचे कार अपघातात निधन झाले. वैभवीने (vaibhavi upadhyay) वयाच्या 32 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. खरंतर वैभवी तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत हिमाचल प्रदेश येथे फिरायला गेली होती. ते दोघेही २३ मे रोजी तीर्थन घाटी येथे जात होते, तेथेच त्यांच्या कारचा अपघात झाला. डोंगराळ भागातील तीव्र वळणावर गाडीचा ताबा सुटल्याने वैभवीची कार ५० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात तिचा मृत्यू झाला. तर तिचा होणारा नवरा सुरेश याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना फारशी गंभीर दुखापत झालेली नाही.

वैभवी ही गुजराती थिएटर सर्कलमध्ये प्रसिद्ध होती. साराभाई व्हर्सेस साराभाई या लोकप्रिय मालिकेतील तिची जास्मिनची भूमिका खूप गाजली होती. वैभवीला डोंगर, दऱ्यांमध्ये फिरायला खूप आवडायचं आणि तिचा शेवटचा इन्स्टाग्राम व्हिडीओही हिमाचल प्रदेश येथील होता.

दीपिका पडूकोण सह केले होते चित्रपटात काम

वैभवीने साराभाई मालिकेशिवाय इतर अनेक मालिकांमध्ये तसेच चित्रपटांमध्येही काम केले होते. दीपिका पडूकोण हिच्यासह छपाक या चित्रपटात तिने स्क्रीन शेअर केली होती. त्यामध्ये तिची महत्वपूर्ण भूमिका होती. तसेच राजकुमार राव आणि टिमरी अभिनीत सिटी लाइट्स सारख्या बॉलिवूडमधील अनेक चित्रपटातही तिने काम केलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार तिचे नेटवर्थ १० लाख डॉलर्स इतके होते. तिचा नुकताच सुरेश गांधी यांच्याशी साखरपुडा झाला होता व दोघेही लवकरच लग्नही करणार होते

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.