Kangana Ranaut | ‘कोणताही पश्चाताप नाही…’, कंगना रनौत हिच्या एक्स-बॉयफ्रेंडचं मोठं वक्तव्य समोर

| Updated on: Aug 01, 2023 | 1:00 PM

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर कंगनाचं प्रसिद्ध अभिनेत्यासोबत झालं ब्रेकअप... अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीच्या एक्स-बॉयफ्रेंडने केला मोठा खुलासा

Kangana Ranaut | कोणताही पश्चाताप नाही..., कंगना रनौत हिच्या एक्स-बॉयफ्रेंडचं मोठं वक्तव्य समोर
Follow us on

मुंबई | 1 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अनेक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडणारी कंगना एकेकाळी तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आले होती. कंगना हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. अभिनेता अध्ययन सुमन (Adhyayan Suman) याच्यासोबत देखील कंगना अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखरे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अध्ययन आणि कंगना यांच्या ब्रेकअपला अनेक वर्ष झाली आहेत. पण त्यांच्या नात्याची चर्चा आजही चाहत्यांमध्ये कायम रंगलेली असते.

जेव्हा अध्ययनने 2017 मध्ये कंगना रनौतसोबतच्या ब्रेकअपबद्दल सांगितलं तेव्हा त्याला टीकेचा सामना करावा लागला. पण त्यावेळी याबद्दल सार्वजनिकरित्या कबुली का दिली? याचा खुलासा अभिनेत्याने आता केला आहे. सध्या सर्वत्र अध्ययन याच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अध्ययन सुमन म्हणाला, ‘आमच्या नात्याबद्दल सार्वजनिकरित्या कबुली दिल्याचा पश्चाताप मला होत नाही. सांगण्यासाठी कोणत्याही परिषदेचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात.’

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेता म्हणाला, ‘लोकांना दुसरी बाजू माहिती होती. ते फक्त दुसऱ्या बाजूबद्दल बोलू इच्छित होते आणि त्यानंतर चर्चा करायची होती. जेव्हा तुम्ही सार्वजनिक डोमेनमध्ये असता तेव्हा अनेक मते असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट स्पष्ट करणं फार गरजेचं असतं…’ सध्या सर्वत्र अभिनेत्याची वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

‘जर मला प्रसिद्धी हवी तर मी नात्याबद्दल खुलासा २००९ मध्येच केला असता, पण मी २०१७ मध्ये मोठा खुलासा केला. तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपमुळे काम मिळत नाही तर, तुमच्या कौशल्यामुळे काम मिळतं. लोकांनी तेव्हा माझ्यावर टीका केली. पण जेव्हा दुसरी बाजू कळली तेव्हा अनेक जण माझी माफी मागण्यासाठी आले.’ असं देखील अभिनेता म्हणाला.

अध्ययन सुमन याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. रिपोर्टनुसार अध्ययन दिग्दर्शित पहिला सिनेमा यंदाच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. सध्या सर्वत्र अध्ययन याच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा सुरु आहे.

अध्ययन सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्याच्या त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतो.