काय सांगता? चक्क रणबीर कपूर याने केले प्रभासच्या चित्रपटाचे 10 हजार तिकिटे खरेदी, अभिनेत्याच्या मनात नेमकं काय?

आदिपुरुष चित्रपट देशभरात 6200 हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे. तसंच या वीकेंडपासून या चित्रपटाच्या तिकिटांचे आगाऊ बुकिंग सुरू होणार आहे. अशातच, अभिनेता रणबीर कपूरने एकट्याने वंचित अनाथ मुलांसाठी 10,000 तिकिटे खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

काय सांगता? चक्क रणबीर कपूर याने केले प्रभासच्या चित्रपटाचे 10 हजार तिकिटे खरेदी, अभिनेत्याच्या मनात नेमकं काय?
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 10:00 PM

मुंबई : सध्या अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सेननचा आदिपुरुष हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या 16 जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागली आहे. तसेच या वीकेंडपासून या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू होणार असल्याची माहिती समोर आली.

आदिपुरुष या चित्रपटाची टीम फक्त हिंदी स्क्रीनिंगसाठी 4000 हून अधिक त्यांचे मॅग्नम ऑपस प्रदर्शित करणार आहे. तसंच दिग्दर्शक ओम राऊत यांचा हा चित्रपट सुरूवातीपासूनच वादात सापडला आहे. चित्रपट वादात सापडल्यानंतर निर्मात्यांनी ट्रेलर पुन्हा रिलीज केला पण तरीही प्रेक्षक अनेक गोष्टींवर आक्षेप घेत आहेत.

आदिपुरुष चित्रपट देशभरात 6200 हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे. तसंच या वीकेंडपासून या चित्रपटाच्या तिकिटांचे आगाऊ बुकिंग सुरू होणार आहे. अशातच, अभिनेता रणबीर कपूरने एकट्याने वंचित अनाथ मुलांसाठी 10,000 तिकिटे खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे चित्रपटाचे निर्माते रामचरण यांनी देखील या चित्रपटाची 10,000 तिकिटे खरेदी केली आहेत जेणेकरून हा चित्रपट वंचित अनाथ मुलांना पाहता येईल.

दरम्यान, आदिपुरुष हा चित्रपट 16 जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने श्रीरामाची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री क्रिती सेनन सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेनं हनुमानाची भूमिका साकारली आहे. सध्या सगळीकडे या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. जरी हा चित्रपटावरून वाद निर्माण झाला असला तरी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.