Adipurush | दीपिका पदुकोणची ‘एक्झिट’, तर क्रितीची नवी एंट्री, प्रभास-सैफच्या ‘आदिपुरुष’मध्ये मोठे बदल!
बॉलिवूड स्टार प्रभास आणि सैफ अली खान यांच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटामध्ये आता अभिनेत्री क्रिती सॅनॉनची वर्णी लागली आहे. तसेच, क्रिती सोबत या चित्रपटात सनी सिंग देखील सामील झाला आहे.
मुंबई : बॉलिवूड स्टार प्रभास आणि सैफ अली खान यांच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटामध्ये आता अभिनेत्री क्रिती सॅनॉनची वर्णी लागली आहे. तसेच, क्रिती सोबत या चित्रपटात सनी सिंग देखील सामील झाला आहे. खुद्द क्रितीने सोशल मीडियावर चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. क्रिती सॅनॉन आणि सनीचा हा एक मोठा चित्रपट आहे. या चित्रपटात सामील झाल्याने दोघेही खूप आनंदी झाले आहेत. क्रितीने सनी, प्रभास आणि चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतसोबतचे फोटो शेअर केले आहेत (Adipurush film cast change Deepika Padukone out kriti sanon joins this film).
यावेळी प्रभास, क्रिती आणि सनी पारंपारिक लूकमध्ये दिसले आहेत आणि क्रिती व सनीच्या चेहऱ्यावर चित्रपटाबद्दलचा आनंद स्पष्टपणे दिसत आहे. फोटो शेअर करताना क्रितीने लिहिले की, ‘एका नव्या प्रवासाची सुरुवात… आदिपुरुष. हा चित्रपट खूप खास आहे. या जादुई दुनियेशी कनेक्ट केले आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो.
पाहा क्रितीची पोस्ट
A new journey begins.. ❤️ One of my most special ones.. overwhelmed to be a part of #Adipurush #Prabhas #SaifAliKhan @mesunnysingh @omraut #BhushanKumar @vfxwaala @rajeshnair06 @TSeries @retrophiles1 #TSeries pic.twitter.com/198BqAuoXT
— Kriti Sanon (@kritisanon) March 12, 2021
(Adipurush film cast change Deepika Padukone out kriti sanon joins this film)
म्हणून दीपिका दिसणार नाही!
या पूर्वी ‘आदिपुरुष’ या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण झळकणार होती. चित्रपटाच्या दिग्दर्शकाची पहिली पसंती दीपिका पदुकोण होती. पण, नंतर असे सांगितले जात होते की, दीपिका आणि प्रभासने नाग अश्विनच्या चित्रपटाला आधीपासूनच साईन केले होते. अशा परिस्थितीत दोघांनाही बॅक-टू-बॅक एकत्र चित्रपटात दिसायचे नाही. दीपिकाने हा चित्रपट सोडल्यामुळे क्रितीला मोठा फायदा झाला. आता क्रिती या मोठ्या चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे. प्रभास आणि सैफसोबत क्रितीचा हा पहिलाच चित्रपट आहे (Adipurush film cast change Deepika Padukone out kriti sanon joins this film).
आदिपुरुषच्या सेटवर आग
काही दिवसांपूर्वी आदिपुरुषच्या सेटवर आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आणि संपूर्ण क्रोमा सेट जळून खाक झाला. निर्मात्यांना मोठा तोटा सहन करावा लागला होता.
सैफ-आदिपुरुष आणि वाद
आदिपुरुषच्या घोषणानंतर हा चित्रपट सतत चर्चेचा एक भाग बनला आहे. अभिनेता सैफ अली खानने रावणाच्या पात्राचे विश्लेषण सिद्ध करतानाच वाद निर्माण करणारे काही वक्तव्य केले होते. एका मुलाखती दरम्यान त्याने रावणाच्या पात्राचे महत्त्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले होते की, लक्षमणाने रावणाची बहीण शूर्पणखाचे नाक कापल्याने रावणाने सीतेचे अपहरण केले, हे न्याय्य आहे आणि तेच ते चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करतील. सैफ अली खानच्या विधानानंतर बरेच वादंग झाले. मात्र, नंतर सैफनेही त्यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती.
(Adipurush film cast change Deepika Padukone out kriti sanon joins this film)
हेही वाचा :
Swapnil Joshi | ‘एलिझाबेथच्या जाळ्या मधून कोणीही सुटू शकत नाही!’, पाहा स्वप्निल जोशीचा हॉरर लूक…