‘दादरला फर्स्ट क्लासमध्ये त्यानं माझ्या छातीला…’, मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या एका अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये धक्कादायक अनुभव सांगितला आहे. या अभिनेत्रीसोबत नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया...

सध्या आपल्या देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना सातत्याने कानावर येत आहेत. अनेक सेलिब्रिटी महिलांनाही या दुर्दैवी घटनांचा, अनुभवांचा सामना करावा लागत आहे. नुकताच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील एक वाईट अनुभव सांगितला आहे. हा अनुभव ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
कोण आहे ही अभिनेत्री?
रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ या चित्रपटातून संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरात पोहोचणारी अभिनेत्री अदिती पोहनकरने तिच्या आयुष्यातील वाईट अनुभव सांगितला आहे. तिने ‘हॉटरफ्लाय’ला नुकतीच मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने सांगितलेला अनुभव ऐकून अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. “दादक स्थानकाहून मी एकदा लोकलमधून प्रवास करत होते. मी फर्स्टक्लासच्या डब्ब्यात चढले. महिलांच्या फर्स्ट क्लास डब्ब्यामध्ये छोट्या शाळकरी मुलांनी आलेले चालते. त्यामुळे काही लहान मुलेही डब्यात चढली होती. तेव्हा मी साधारणतः अकरावीत शिकत होते. माझ्यासमोर डब्यात एक मुलगा उभा होता. दादरवरुन जशी ट्रेन निघाली, त्याने माझ्या छातीला हात लावला…’ असे अदिती म्हणाली.




वाचा: बिनकामाचे वाद उकरून काढून…; मटणाच्या सर्टिफिकेट्सवरुन अभिनेत्याची पोस्ट
अभिनेत्री पोहोचली पोलीस ठाण्यात
पुढे ती म्हणाली, “ही घटना माझ्यासोबत भर दिवसा, सकाळी अकरा वाजता घडली. माझ्यासोबत जेव्हा हे सगळ घडत होते तेव्हा मी कुर्ता घातला होता. त्यामुळे मी काही अशातशा कपड्यामध्ये नव्हतेच. समोरच्या मुलाचा असा काही हेतू असेल असे मला जराही वाटले नव्हते. पण त्याने जे कृत्य केले त्यानंतर मला धक्काच बसला. मी पुढच्याच स्टेशनवर उतरले आणि पोलीस स्थानकात गेले. पण, त्यावेळी पोलिसांनी दिलेली प्रतिक्रियेने मला मोठा धक्का बसला. काही झाले तर नाही ना तुम्हाला, आता कुठे त्याला शोधणार? असे म्हणत त्या पोलिसांनी उडवून लावले.”
आदितीला तो मुलगा पुन्हा रेल्वे स्थानकात दिसला. तो मुलगा पुन्हा दुसऱ्या मुलीसोबत तेच करण्याच्या तयारीत असताना ती पोलिसांना घेऊन त्याच्याकडे गेली. याविषयी बोलताना अदिती म्हणाली की, ‘त्यावेळी पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नानं पुन्हा एकदा मला धक्का बसला. पोलिसांनी माझ्याकडे पुरावा मागितला. मी विचारले, पुरावा कशाला हवा? त्याने माझ्यासोबत ते कृत्य केलय म्हटल्यावर मला माहीत असणारच ना…’ अदिती पोलिसांना घेऊन त्या मुलाकडे गेली तेव्हा त्याने सर्व आरोप फेटाळून लावले. शेवटी अदिती प्रचंड चिडली आणि मोठ्या आवाजात त्याच्याशी बोलू लागली. त्यानंतर त्या मुलाने कबुली दिली.