ती अनेकदा माझ्या घरी यायची; कंगना अन् आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल अभिनेत्याचा पत्नीचा खुलासा
आदित्य पांचोली आणि कंगना राणौत यांच्यातील अफेअरचा आदित्यच्या पत्नीनेच खुलासा केला आहे. एका मुलाखतीदरम्यान आदित्यच्या पत्नी यांनी कंगना आदित्यसोबत घरी यायची तसेच त्यांच्या अफेअरबद्दल घरी माहित होतं असंही ती म्हणाली.
बॉलिवूडमध्ये अफेअर्स, घटफोस्ट, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर या सगळ्या सामान्य गोष्टी आहे. त्यांची चर्चा मात्र तेवढी होते. यातील काही अफेर्सची चर्चा ही आजपर्यंत होताना दिसते. त्यातील चर्चेत आलेलं नातं म्हणजे कंगना राणौत आणि आदित्या पांचोली.
बॉलिवूडमध्ये कंगनाचे नाव हे अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं. पण त्यात जास्त वादग्रस्त ठरलं ते आदित्य पांचोलीसोबतचं नातं. कंगना तिच्या आदित्य पांचोलीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली होती. आत ती चर्चा पुन्हा एकदा होताना दिसते.
कारण एका मुलाखीतदरम्यान आदित्य पांचोलीची पत्नी जरीना यांनी आदित्य आणि कंगना राणौत यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल खुलासा केला आहे. जरीना बहवने यांनी सांगितले की कंगना रणौत आणि आदित्य पांचोलीचे अफेअर तिच्या नकळत सुरु असल्याचं त्या उघडपणे म्हणाल्या.
मलाखतीदरम्यान जरीना म्हणाली, ‘मला आदित्य पांचोलीच्या अफेअर्सबद्दल पहिल्या दिवसापासून माहिती होती. घरी आल्यानंतर आदित्य माझ्याशी कसे वागतात हे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. त्यांना घरात मोकळेपणाने राहता यावे म्हणून कोणतेही बंधन घालायचे नाही, असे मी लग्नापूर्वीच ठरवले होते. आदित्य पांचोली कधीही कोणावर हात उचलू शकत नाही. त्याच्या माजी मैत्रिणींनी त्यांच्यावर आरोप केले कारण त्यांना जे हवे होते ते झाले नाही.
जरीना पुढे म्हणाली, ‘मी नेहमीच कंगना राणौतचे स्वागत केले आहे. ती अनेकदा माझ्या घरी यायची. आदित्य पांचोली कंगना राणौतला त्याची चांगली मैत्रीण म्हणत असे. मात्र, या दोघांचे अफेअर कधी सुरू झाले याची मला कल्पना नव्हती. आदित्य पांचोली एक चांगले वडील आणि पती आहेत. त्यांनी माझ्यावर कधीही कोणतेही बंधन घातले नाही. आजही मी सर्व कामे मनापासून करते”. असं म्हणत जरीनाने आदित्य आणि कंगणाच्या अफेअर्सच्या चर्चा खऱ्या असून ते तिला माहित असल्याचेही कबुल केले.
मात्र तिने हेही म्हटले की तो एक भूतकाळ होता. आणि आदित्य एक पती म्हणून तिच्याशी कधीही वाईट वागले नसल्याचे तिने म्हटलं. जरीनाच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. जरीना वक्तव्यामुळे कंगना रनौत आणि आदित्य पांचोली यांचे एकेकाळी अफेअर असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र जेव्हा या चर्चा होत होत्या तेव्हा मात्र दोघांनीही हे कधीच मान्य केले नाही.