केस आता खुद्द डॅाक्टर धन्वंतरींच्या हातात… आईच्या निधनानंतर डॉ. गिरीश ओक यांची डोळे ओलावणारी कविता

पडद्यावर अभिजीत राजेची संवेदनशील भूमिका साकारणारे डॉ. गिरीश ओक हे वैयक्तिक आयुष्यातही किती हळवे आहेत, याचा प्रत्यय त्यांच्या कवितेच्या निमित्ताने आला. (Actor Dr Girish Oak Poem mother)

केस आता खुद्द डॅाक्टर धन्वंतरींच्या हातात... आईच्या निधनानंतर डॉ. गिरीश ओक यांची डोळे ओलावणारी कविता
डॉ. गिरीश ओक यांना मातृशोक
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 2:47 PM

मुंबई : झी मराठी वाहिनीवर गाजलेल्या ‘अग्गंबाई सासुबाई’ या मालिकेचा पुढचा भाग ‘अग्गंबाई सूनबाई’ नुकताच सुरु झाला. या मालिकेत दिग्गज अभिनेते डॉ. गिरीश ओक हे अभिजीत राजे ही मुख्य भूमिका साकारत आहेत. एकीकडे मालिकेचं नवं पर्व सुरु झाल्याचा आनंद असताना डॉ. ओक यांना वैयक्तिक आयुष्यात एका दुःखद प्रसंगाला सामोरे जावे लागले. गिरीश ओक यांना मातृशोक झाला. त्यानंतर त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. (Aggabai Soonbai Fame Veteran Marathi Actor Dr Girish Oak writes Poem after mother breathes last)

पडद्यावर अभिजीत राजेची संवेदनशील भूमिका साकारणारे डॉ. गिरीश ओक हे वैयक्तिक आयुष्यातही किती हळवे आहेत, याचा प्रत्यय त्यांच्या कवितेच्या निमित्ताने आला. डॉ. ओक यांच्या मातोश्री शशीकला रत्नाकर ओक यांचे गेल्या रविवारी (21 मार्च) वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर काही दिवसांनी डॉ. गिरीश ओक यांनी फेसबुकवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आपल्या आईच्या बाबतीत प्रत्येक जण हळवा असतो. डॉ. ओक यांच्या भावना प्रत्येक मुला-मुलीच्या डोळ्यांच्या कडा पाणावतील. “माझी आई जन्म 22 सप्टेंबर 1937 परवाच 21 मार्च 2021 ला मला आत्मनिर्भर करुन गेली आणि कधीतरी कोणाचं तरी सांत्वन करण्यासाठी मीच केलेली ही कविता माझंच सांत्वन करायला धावून आली आणि माझ्यात सकारात्मकता भरून गेली.” असं गिरीश ओक यांनी लिहिलंय.

डॉ. गिरीश ओक यांनी मातोश्रींवर लिहिलेली कविता

“इथला धीर पुरेनासा होतो इथलं औषध लागेनासं होतं इथली हवा मानवेनाशी होते मग जगण्याची इच्छाच नाहीशी होते बट डोन्ट से द पेशंट ईझ डेड बट द पेशंट ईझ ट्रान्सफर्ड टू सूपर आय सी यू तिथला धीर खोटा खोटा नसतो अमृत फार्मास्युटिकल्सच्या औषधांमधे भेसळ नसते अहो क्वॅालिटी कंट्रोल बोर्डावर चक्क अश्विनी कुमार बसलेले असतात नं ! आणि हवं नको ते बघायला मुलं नातवंडं नाही तर चक्क आई बाबा आजी आजोबा खापर खापर सगळेच तिथल्या हवेत पोल्यूशन नसतं सगळंच कसं इथल्या पेक्षा अपग्रेडेड असतं तिथे जगण्या साठी शरीराची गरजच नसते मग ते थकलं काय नी नसलं काय फक्त इथल्या आय सी यू च्या दाराच्या काचेतून तुम्ही पेशंटला बघू शकतात हेल्पलेसपणे ती सोय (?) सूपर आय सी यू ला नाही पण काळजी करू नका केस आता खुद्द डॅाक्टर धन्वंतरींच्या हातात आहे सो डोन्ट वरी ”

—————————

“आई” तू आमच्या समोर नसणार आहेस पण आमच्या पाठीशी असणार आहेस माहितीये आम्हाला. – दुर्गा पल्लवी गिरीश (Actor Dr Girish Oak Poem mother)

“सौ शशीकला रत्नाकर ओक” माझी आई जन्म २२ सप्टेंबर १९३७ परवाच २१ मार्च २०२१ ला मला आत्मनिर्भर करून गेली आणि कधीतरी कोणाचं…

Posted by Dr. Girish Oak on Monday, 22 March 2021

डॉ. गिरीश ओक यांची कारकीर्द

डॉ. ओक यांचा जन्म नागपूरचा. त्यांनी आयुर्वेद, मेडिसीन आणि सर्जरी या विषयात पदवी मिळवली आहे. डॉक्टरकीचे शिक्षण घेतले असले, तरी महाविद्यालयीन जीवनापासून ते एकांकिका, नाटकं यांच्यात काम करत आले आहेत. 1984 मध्ये त्यांची कारकीर्द सुरु झाली. गेल्याच वर्षी त्यांनी वयाची साठी ओलांडली.

डॉक्टर गिरीश ओक यांनी आजवर अनेक चित्रपट, मालिका, नाटकांमधून भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी रेखाटलेल्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या आहेत. अग्गंबाई सासुबाई, अग्गंबाई सूनबाई, जुळून येती रेशीमगाठी, बंदिनी, दामिनी, अवंतिका, किमयागार, दुहेरी, या सुखांनो या, अधुरी एक कहाणी, या गोजिरवाण्या घरात, अग्निहोत्र, पिंजरा यासारख्या असंख्य मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. यू टर्न, लव्ह बर्ड्स, कुसुम मनोहर लेले, तो मी नव्हेच अशा नाटकांत त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत.

संबंधित बातम्या :

तब्बल 13 वर्षानंतर झाली बाप-लेकीची भेट, पलक तिवारीला पाहून राजा चौधरी भावूक!

‘साथ दे तू मला’ फेम लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीचा साखरपुडा

अजिंक्य देव-लक्ष्मीकांत बेर्डेंची हिरोईन ते काकीसाहेब, पूजा पवार यांची कारकीर्द ‘लय भारी’

(Aggabai Soonbai Fame Veteran Marathi Actor Dr Girish Oak writes Poem after mother breathes last)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.