सुशांत प्रकरणात ‘एम्स’ टीमकडे 12 महत्त्वाचे लीड्स, हत्येची शक्यता तपासण्याची सीबीआयला सूचना

'एम्स'ने फॉरेन्सिक तज्ञांची पाच सदस्यीय वैद्यकीय टीम स्थापन केली आहे. सुशांतसिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टवर या टीमला संशय आहे.

सुशांत प्रकरणात 'एम्स' टीमकडे 12 महत्त्वाचे लीड्स, हत्येची शक्यता तपासण्याची सीबीआयला सूचना
Follow us
| Updated on: Aug 26, 2020 | 11:18 AM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला दररोज धक्कादायक वळणं मिळत आहेत. दिल्लीहून मुंबईला आलेल्या ‘एम्स’च्या फॉरेन्सिक डॉक्टरांच्या टीमला सुशांत प्रकरणात 12 महत्वाचे लीड्स सापडले आहेत. त्यामुळे हत्येच्या दृष्टिकोनातून तपास करण्यास ‘एम्स’ने सीबीआयला सुचवले आहे. सुशांतच्या फ्लॅटमेट्सचीही कसून चौकशी होण्याची शक्यता आहे. (AIIMS suspect Homicide angle in Sushant Singh Rajput Death Case Suggests CBI to inquire)

‘एम्स’ने फॉरेन्सिक तज्ञांची पाच सदस्यीय वैद्यकीय टीम स्थापन केली आहे. सुशांतसिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टवर या टीमला संशय आहे. सुशांतच्या शवविच्छेदन अहवालाची तपासणी करुन ‘एम्स’ची टीम मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी मदत करेल.

सुशांतच्या व्हिसेरा अहवालाची तपासणीही फॉरेन्सिक टीम करणार आहे. त्याचे निष्कर्ष शुक्रवारी सीबीआयला सोपवले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. सोमवारी सायंकाळी सुशांतचे पोस्टमॉर्टम व अन्य अहवाल एम्स टीमला देण्यात आले.

सुशांतच्या रहस्यमय मृत्यूभोवताली असलेल्या संशयास्पद पुराव्यांमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे हत्याकांड घडल्याची शक्यताही पडताळून पाहिली जात असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.

रिया चक्रवर्तीच्या कथित व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये ‘ड्रग्ज अँगल’

रिया चक्रवर्तीच्या मोबाईलवरुन पाठवलेले व्हॉट्सअ‍ॅप मेसेज समोर आले आहेत. ज्यामध्ये रियाने एमडीएमए, गांजा अशा ड्रग्जचा उल्लेख केल्याचे दिसते. जया साहा नावाच्या व्यक्तीने रियाला “चहा किंवा पाण्यात 4 थेंब वापर आणि त्याला पिऊ दे… किक बसायला 30-40 मिनिटे दे” असे मेसेज केले आहेत.

एका कथित चॅटमध्ये रिया ही गौरव आयरा नावाच्या संशयित ड्रग्ज विक्रेत्याशी बोलत आहे. ती म्हणते, “हार्ड ड्रग्जबद्दल बोलायचं तर मी जास्त घेतलेले नाहीत. एकदा एमडीएमए घेण्याचा प्रयत्न केला” या मेसेजनंतर “आपल्याकडे एमडी आहे का?” अशी विचारणा रियाने केली. 8 मार्च 2017 रोजी तिने हा मेसेज केला होता. (AIIMS suspect Homicide angle in Sushant Singh Rajput Death Case Suggests CBI to inquire)

यातील सर्वात चकित करणारा संवाद रिया आणि जया साहा नावाच्या व्यक्ती दरम्यान होता. 25 नोव्हेंबर, 2019 रोजी जयाने रियाला “मी तिला श्रुतीशी समन्वय करण्यास सांगितले” असे म्हटले होते. त्यानंतर “चहा किंवा पाण्यात 4 थेंब वापर आणि त्याला पिऊ दे… किक बसायला 30-40 मिनिटे दे” असे मेसेज केले आहेत.

दरम्यान, रियाने तिच्या आयुष्यात कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही. ती रक्त तपासणीसाठी तयार आहे, असे उत्तर रियाच्या वकिलांनी दिले आहे.

मृत्यू प्रकरणात ‘ड्रग्ज अँगल’ उघडकीस आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) या प्रकरणात चौकशी सुरु करण्याची शक्यता आहे. ईडीने जया साहाला समन्स बजावले आहे. 

संबंधित बातम्या :

रुग्णवाहिका चालकाला चार वेळा फोन, निर्माता संदीप सिंह सीबीआयच्या रडारवर

रियाकडून सुशांतवर आध्यात्मिक उपचार, सीबीआय पंडित, पुजारी तांत्रिक-मांत्रिकांचीही बाजू तपासणार

(AIIMS suspect Homicide angle in Sushant Singh Rajput Death Case Suggests CBI to inquire)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.