रिसेप्शन पार्टीत संपूर्ण बच्चन कुटुंब पण ऐश्वर्या कुठेच नाही; अभिषेकला एकटं पाहून पुन्हा घटस्फोटाच्या चर्चा
ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला उधाण आले आहे. एका कार्यक्रमात बच्चन कुटुंब एकत्र दिसत आहे. अभिषेकही आहे. पण ऐश्वर्या आणि आराध्या कुठेच दिसत नसल्याने पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि अभिषेक तसेच बच्चन कुटुंबातील नाराजीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे. अलीकडेच संपूर्ण बच्चन कुटुंब एका कार्यक्रमात सहभागी झाले होते पण ऐश्वर्या मात्र कुठेच दिसली नाही. त्यामुळे ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबातील नाराजी कायम असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनच्य घटस्फोटाच्या पुन्हा चर्चा
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड गाजल्या. मात्र जेव्हा दोघेही त्यांची मुलगी आराध्याच्या शाळेच्या वार्षिक समारंभात एकत्र दिसले तेव्हा या चर्चांना पूर्णविराम मिळेल असंच वाटलं होतं.
मात्र पुन्हा एकदा आता ही चर्चा सुरू झाली आहे. त्याचे कारण म्हणजे बच्चन कुटुंबातील व्यवस्थापकीय संचालकांच्या मुलाची रिसेप्शन पार्टी. या पार्टीचे फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये पुन्हा एकदा संपूर्ण कुटुंब सहभागी झाले आहे, परंतु ऐश्वर्या आणि आराध्या कुठेही दिसल्या नाहीत.
रिसेप्शन पार्टीत बच्चन कुटुंबाची सून दिसलीच नाही
वास्तविक, अभिषेक बच्चन, जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी नुकतेच मुंबईतील एका कार्यक्रमात हजेरी लावली, ज्याचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये लोकांच्या नजरा बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चनला शोधत आहेत.
बच्चन कुटुंबाने त्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांचा मुलगा रिकिन यादव आणि सुरभी यांच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली होती, ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब या जोडप्यासोबत स्टेजवर पोज देताना दिसत होते पण ऐश्वर्या उपस्थित नव्हती. त्यामुळे पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबातील नाराजी अजून संपलेली नाही अशा चर्चा पुन्हा सुरु झाल्या.
Amitabh Bachchan, Jaya Bachchan, and Abhishek Bachchan graced the wedding reception of Rikin Yadav and Surabhi in Mumbai. Rikin is the son of Shree Rajesh Yadav, the Managing Director who has been associated with the Bachchan’s over three decades. pic.twitter.com/PalrZmisBx
— Narendra Gupta (@narendragupta19) December 30, 2024
सून ऐश्वर्या कुठे आहे? नेटकऱ्यांचे सवाल
ऐश्वर्याच्या अनुपस्थितीमुळे घटस्फोटाचा मुद्दा पुन्हा लोकांमध्ये उपस्थित झाला आहे. तसेच या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंटस् केल्या आहेत. काहींनी म्हटलं आहे ‘सून ऐश्वर्या कुठे आहे?’ तर काहींनी ” पुन्हा काहीतरी झालं वाटतं” अशा अनेक चिडवणाऱ्या कमेंटस् येताना दिसत आहे.
यापूर्वीही एका फंक्शन्समध्ये असेच घडले होते
याआधीही एका कार्यक्रमादरम्यान ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबातील अंतर पाहून ही बातमी वेगाने पसरू लागली होती. ही घटना अंबानी कुटुंबाचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न समारंभातील आहे, ज्यामध्ये ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन कुटुंबातील इतरांपेक्षा वेगळे फिरताना दिसल्या होत्या. त्याचबरोबर ऐश्वर्याचा बच्चन कुटुंबासोबतचा एकही फोटो तेव्हाही नव्हता.
कोणीही निवेदन दिले नाही
आता पुन्हा तेच पाहिल्यानंतर लोकांनी पुन्हा तोच मुद्दा उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. जेव्हापासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हापासून ऐश्वर्या आणि अभिषेक या मुद्द्यावर काहीही बोललेले नाहीत. त्याच्यासोबत बच्चन कुटुंबानेही कोणतेही वक्तव्य केलेले नाही. पण आता या फोटोंमुळे पुन्हा एकदा जोडप्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना हवा मिळाली आहे.