Aishwarya-Abhishek : अभिषेकने केली ऐश्वर्याची फसवणूक ? ‘या’ अभिनेत्रीमुळे संसारात आग? एका व्हिडीओने…

Aishwarya Rai And Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनचं नातं नेहमीच चर्चेत असतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांच्या नात्यात दरी पडल्याची, तसेच त्यांच्या घटस्फोटाबद्दलची अफवा पसरली आहे. मात्र या दोघांपैकी कोणीच त्यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. ऐश्वर्या-अभिषेकच्या नात्यात जे वितुष्ट आलंय त्यासाठी एक अभिनेत्री कारणीभूत असल्याची चर्चा सुरू आहे.

Aishwarya-Abhishek : अभिषेकने केली ऐश्वर्याची फसवणूक ? 'या' अभिनेत्रीमुळे संसारात आग? एका व्हिडीओने...
अभिषेक आणि ऐश्वर्याचा संसार कोणामुळे मोडला ?Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 12:00 PM

सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे बॉलिवूडमधलं सुपर कपल. मात्र गेल्या काही काळापासून त्यांच्या नात्याबद्दल बरीच वेडीवाकडी चर्चा सुरू आहे. दोघांच्या नात्यात काहीच आलबेल नसल्याची, घटस्फोटाची अफवाही बऱ्यात काळापासून पसरली आहे. ऐश्वर्याचे सासरे , अभिषेकचे वडील, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा गेल्या आठवड्यात (11 ऑक्टोबर) वाढदिवस झाला. त्यावेळी एक व्हिडीओ समोर आला, त्यामुळे तर अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या बातम्यांना अजूनच हवा लागली. सोशल मीडियावरही या दोघांच्या नात्याबद्दल सतत काही ना काही बोललं जात असतं, मात्र त्यावर त्या दोघआंपैकी कोणीच अजून प्रतिक्रिया दिलेली नाही. असं असलं तरीही त्यांच्यात काहीच ठीक नाही , अशा अनेक हिंट्स मिळत असतात. याचदरम्यान आता ‘रेडिट’वर अनेक युजर्स अभिषेक बच्चनवर भडकले आहेत. एका अभिनेत्रीमुळे त्या दोघांच्या नात्यात वितुष्ट आल्याची मोठी चर्चा सुरू आहे.

एक रेडिड युजरने केलेल्या दाव्यानुसार, अभिषेक बच्चन याने ऐश्वर्याची फसवणूक केली आहे, त्यामुळेच त्यांच्यात काहीच ठीक नाही. बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या दिवशी केबीसीमध्ये एक व्हिडीओ दाखवण्यात आला. त्यामध्ये पत्नी जया बच्चन, मुलगी श्वेता बच्चन नंदा, मुलगा अभिषेक बच्चन, नातू अगस्त्य नंदा आणि नात नव्या नवेली नंदा या सर्वांनी अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये त्यांची नात आराध्याचेही फोटो दिसले. पण त्या व्हिडीओत ऐश्वर्या राय कुठेच दिसली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. त्या व्हिडीओवरूनच सगळं स्पष्ट झाल्याचं ‘रेडिट’ युजर्सचं म्हणणं आहे, आणि त्यानंतरच अनेकांनी अभिषेक बच्चनला ट्रोल करण्यास सुरूवात केली. अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्यासाठी एक अभिनेत्री जबाबदार असल्याची चर्चा सुरू झाली.

कोणामुळे अभि-ॲशच्या संसरारात वितुष्ट ?

2022 साली अभिषेक बच्चनचा ‘दसवीं’ हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यामध्ये अभिषेकने निमरत कौरसोबत कम केलं होतं. आता Redditवर त्या दोघांच्या डेटिंगबद्दल अफवा पसरल्या आहेत. अनेक युजर्सचं असं म्हणणं आहे की तिच्यामुळेच अभिषेकने ऐश्वर्याची फसवणूक केली आणि आता दोघेही एकाच घरात रहात नाहीत. या ट्रोलिंगमुळे गेल्या अनेक दिवसांपासून निमरत कौरही चर्चेत आहे. सोशल मीडियावर अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की एअरलिफ्ट चित्रपटादरम्यान तिचं नाव अभिनेता अक्षय कुमारसोबतही जोडलं गेलं होतं. मात्र यात किती तथ्य आहे, खर काय आहे हे अद्याप कोणालाच माहिती नाही.

अभिषेक बच्चन आणि निमरत कौर

लोकांकडून ट्रोलिंग

या अफवेनंतरच अभिषेक बच्चन आणि निम्रत कौर यांच्या ‘दसवी’ चित्रपटाच्या प्रमोशनचे फोटोही व्हायरल होत आहेत. मात्र या बातमीवर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय किंवा निम्रत कौर यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या व्हिडिओ मेसेज कॉलवर ऐश्वर्या राय दिसली नाही तेव्हाच या बातमीला आणखी हवा लागली. ते दोघे (ऐश्वर्या-अभिषेक) दोघे आधीच वेगळे झालेत, हे स्पष्ट झालं, असं काहींनी लिहीलं. मात्र या बाबींमध्ये कितपत तथ्य आहे, ते त्या दोघांनाच माहीत. त्यावर आता ते काही प्रतिक्रिया देतात का याकडेही लोकांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.