ऐश्वर्याच्या Kiss वरून गदारोळ, अभिषेक बच्चनची रिॲक्शन चर्चेत; त्याची काहीच गरज..

बॉलीवूडमधील बच्चन कुटुंबाची नेहमीच चर्चा असते. सध्या अभिनेता अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी, अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यात दुरावा असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. घटस्फोटाच्या वृत्तावर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी हे जोडपे सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरलं आहे,

ऐश्वर्याच्या Kiss वरून गदारोळ, अभिषेक बच्चनची रिॲक्शन चर्चेत; त्याची काहीच गरज..
Follow us
| Updated on: Feb 16, 2024 | 2:16 PM

Aishwarya Rai and Abhishek Bachchan : बॉलीवूडमधील बच्चन कुटुंबाची नेहमीच चर्चा असते. सध्या अभिनेता अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी, अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यात दुरावा असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. घटस्फोटाच्या वृत्तावर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी हे जोडपे सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा विषय आहे. त्यांच्यात काही आलबेल नाही, श्वेता बच्चनमुळेच ऐश्वर्या नाराज आहे, अशीही चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र बच्चन कुटुंबियांपैकी कोणीच यावर भाष्य करताना दिसत नाही.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर ऐश्वर्याबद्दलचा एक जुना मुद्दा चर्चेत आला होता. ऐश्वर्याच्या किसींग सीनवरून तेव्हा मोठा गदारोळ झाला होता. 2009 साली एका मुलाखतीत ऐश्वर्यला किसिंग सीनबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ओप्रा विन्फ्रेने ऐश्वर्या रायला विचारले होते- तू कधीच स्क्रीनवर किसिंग सीन का दिला नाहीस ? या प्रश्नावर ऐश्वर्या फक्त हसली. त्यानंतर ती तिचा पती, अभिषेकला म्हणाली- गो अहेड बेबी. तिने असं म्हणताच अभिषेकन लागलीच तिच्या गालावर किस केलं. त्यानंतर अभिषेक म्हणाला, वेस्टर्न चित्रपटात हे जेवढ्या खुलेपणाने होतं, तेवढं आमच्या (हिंदी) चित्रपटात खुलेपणाने दाखत नाहीत.

प्रेम जाहीर करण्यासाठी किस

हे सुद्धा वाचा

मुलाखतीत अभिषेक बच्चन म्हणाल – या गोष्टी स्वीकारल्या जातील किंवा नाही, हा मुद्दा नाही, पण आमच्या प्रेक्षकांना त्याची गरज वाटत नाही. जेव्हा एखादा मुलगा एखाद्या मुलीला भेटतो आणि जेव्हा ते प्रेमात पडतात. तेव्हा ते फक्त त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी चुंबन घेतात. भारतीय चित्रपटांमध्ये असे प्रेम दाखवण्यासाठी एक गाणं असते. सर्व जिव्हाळ्याचे क्षण त्या गाण्यातच घडतात. तुम्हाला हिरो-हिरॉईन हे पर्वतांमध्ये किंवा समुद्राच्या किनाऱ्यावर नाचताना आणि गाताना दिसतील.

‘धूम 2’ मध्ये ऐश्वर्याच्या किसची झाली होती चर्चा

2006 साली रिलीज झालेल्या ‘धूम 2’ मध्ये ऐश्वर्या राय बच्चनने फिल्मचा मुख्य हिरो हृतिक रोशन सोबत लिपलॉक सीन दिला होता. मात्र त्या किसमुळे बराच गदारोळ झाला होता.तेव्हा तर अभिषेक आणि ऐश्वर्याचं लग्नदेखील झालं नव्हतं. नंतर 2007 साली अबिषेक-ऐश्वर्याने लग्न केलं. मात्र लग्नानंतर स्क्रीनवर किसींग सीन देण्यास ऐश्वर्याने थेट नकार दिला होता.

रणबीरसोबत सोबतच्या सीनमुळेही वाद

तर 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटात ऐश्वर्या रायने तिचा सहकलाकार रणबीर कपूरसोबत पडद्यावर केवळ चुंबन दृश्येच दिली नाहीत तर अनेक इंटिमेट सीन्सही दिले होते. त्यावेळीही ऐश्वर्ला अनेक वादांचा सामना करावा लागला होता. रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या राय बच्चनच्या सासू जया बच्चन यांनाही त्यांच्या सुनेची ही कृती आवडली नसल्याचे समोर आले होते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.