घटस्फोटाची अफवा सुरू असतानाच ऐश्वर्या रायचं मोठं विधान; आता काय? चर्चांना उधाण
Abhishek Bachchan Aishwarya Rai Divorce Rumours : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या कित्येक दिवसांपासून पसरत आहेत. या जोडप्याने आत्तापर्यंत या अफवांवर कोणतीही थेट प्रतिक्रिया दिली नाही किंवा पुष्टी केली नाही, तरीही लोकांचे विविध अंदाज वर्तवणं सुरूच आहे. याच दरम्यान ऐश्वर्या रायचं एक वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचं लग्न मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे, त्यांचा लवकरच घटस्फोटच होणार या आणि अशा अनेक बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून फिरत आहेत. मात्र त्यावर त्या दोघांनी किंवा बच्चन कुटुंबियांपैकी कोणीच प्रतिक्रिया दिलेली नाही. याच बातम्यांदरम्यान, अनेक लोकं या जोडप्याचे जुने व्हिडिओ आणि मुलाखती शोधत असतात, ज्यामध्ये ते त्यांच्या नात्याबद्दल किंवा घटस्फोटाबद्दल बोलताा दिसतात. दरम्यान, ऐश्वर्या रायने एका प्रसिद्ध चॅट शोमध्ये दिलेली घटस्फोटावरची टिप्पणी देखील सध्या व्हायरल होत आहे.
जेव्हा ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केले तेव्हा ती त्याच्यापेक्षा मोठी स्टार होती. तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि बॉलिवूडचे अनेकदा प्रतिनिधित्व केलं होतं. परदेशातही ती इतकी प्रसिद्ध होती की तिला ओप्रा विन्फ्रेच्या प्रसिद्ध चॅट शोमध्ये दोनदा आमंत्रित करण्यात आले होते. 2005 साली झालेल्या एका एपिसोडमध्ये ऐश्वर्या आणि ओप्रा या दोघीही भारत आणि अमेरिकेच्या संस्कृतीबद्दल बोलत होत्या. त्यावेळी दोघींमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. भारतात सार्वजनिक ठिकाणी किस करणं हे काही कॉमन नाही, असं तेव्हा ऐश्वर्या म्हणाली होती. तिने अरेंज्ड मॅरेजबाबतही आपलं मत मांडलं होतं.
ऐश्वर्याला विचारले अनेक प्रश्न
या शोमध्ये ओप्राने अनेक प्रश्न विचारले आणि ऐश्वर्याने धीटपणे त्याची उच्चरं दिली. ओप्राने रॅपिड फायर राउंडमध्ये ऐश्वर्याला विचारले, ‘तू तुझ्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतोस. ते (भारतीय) अमेरिकन स्त्रियांकडे कसे पाहतात? ते त्यांना उद्धट,रूड मानतात का? त्यावर ऐश्वर्या तत्काळ म्हणाली, ‘भारतीय लोक खूप आपुलकीने,खेळीमेळीने वागतात.’ त्यावर ओप्राने विचारले, ‘आम्ही खूप बोलतो का, असं त्यांना वाटतं का ? ‘ यावर ऐश्वर्या म्हणाली, ‘हो, असं वाटू शकतं.’ नंतर ओप्राने आणखी एक प्रश्न विचारला ‘ आमच्याकडे खूप घटस्फोट होतात, असं त्यांना (भारतीयांना) वाटतं का ?’ त्यावर ऐश्वर्याचं उत्तर खरंच ऐकण्यासारखं होतं, ती मजेत म्हणाली..’हमम, हा वादाचा मुद्दा ठरू शकतो’ असं ती म्हणाली.
सर्व अफवा फेटाळल्या
ऐश्वर्या आणि अभिषेकने घटस्फोटाच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. ते दोघेही गेल्या वर्षभरापासून त्याच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत होते, पण त्या दोघांनीही या बातम्या स्वीकारल्या नाहीत किंवा त्या नाकारल्या देखील नाहीत. पण त्यानंतर अनेक कार्यक्रमांना ते एकत्र दिसले, आणि वेगळं होण्याच्या सर्व बातम्या अफवा असल्याचं त्यांनी कृतीतून दर्शवलं. गेल्या आठवड्यातच ऐश्वर्या ही पती अभिषेकसोबत आशुतोष गोवारीकर यांचा मुलगा कोणार्क गोवारीकरच्या लग्नाच्या रिसेप्शनला गेली होती.
कामाबद्दल सांगायचं झालं तर अभिषेकचा ‘बी हॅप्पी’ हा चित्रपट अलीकडेच प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. तर ऐश्वर्या राय ही शेवटची ‘पोनियिन सेल्वन पार्ट 2’ मध्ये दिसली होती.