Aishwarya & Aardhya Bachchan : हिला एवढंही समजत नाही का ? ‘त्या’ कृतीमुळे आराध्या बच्चन ट्रोल, चियां विक्रमसोबत असं काय केलं?
अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला नुकताच 'पोन्नियिन सेल्वन' चित्रपटासाठी SIIMA चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या पुरस्कार सोहळ्यासाठी तिची लेक आराध्या देखील उपस्थित होती. ऑडियन्समध्ये बसून ती ऐश्वर्याचे फोटो काढण्यात मग्न होती. याच फंक्शनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये चियां विक्रम हे ऐश्वर्या शेजारील खुर्चीवर येऊन बसतो. पण तो व्हिडीओ पाहून लोक संतापले आहेत.
अभिनेत्री ऐश्वर्या राय ही गेल्या बऱ्याच काळापासूनन या नात्यामुळे लाईमलाईटमध्ये आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन या दोघांमध्ये काहीही आलेबल नसल्याच्या अफवा गेल्या कित्येक महिन्यांपासून उठल्या आहेत. अंबानींच्या लग्न सोहळ्या दरम्यान देखील अभिषेक हा संपूर्ण बच्चन कुटुंबासोत आला होता तर त्यानंतर काही वेळाने ऐश्वर्या आणि आराध्याची वेगळी एंट्री झाली. त्यांच्यातील तणावाच्या बातम्या गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहेत, मात्र त्यावर ऐश्वर्या किंवा अभिषेक कोणीची प्रतिक्रिया दिल्या नाहीत. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या ही लेक आराध्यासह दुबईमध्ये आहे. SIIMA मध्ये सहभागी होण्यासाठी ती तेथे गेली होती. याचदरम्यान पोन्नियिन सेल्वन’ चित्रपटासाठी ऐश्वर्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
या पुरस्कार सोहळ्यासाठी तिची लेक आराध्या देखील उपस्थित होती. प्रेक्षकांमध्ये बसून तिने आईला पुरस्कार मिळताना, त्या क्षणाचे अनेक फोटो क्लिक केले. याचदरम्यान सोशल मीडियावरही एक व्हिडीओ खूप व्हायरल झालाय. ज्यामध्ये साऊथचा सुपरस्टार चियां विक्रम हा देखील पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पोहोचला आणि ऐश्वर्याच्या शेजारच्या सीटवर जाऊन बसला. त्यापूर्वी त्याने ऐश्वर्या आणि तिच्या लेकीची, आराध्या हिची देखील भेट घेतली, आराध्याही त्याला प्रेमाने भेटली.
फंक्शनला पोहोचताच चियां विक्रम ज्या पद्धतीने ऐश्वर्या रायला भेटला ते लोकांना खूप आवडलं. पण आराध्या ट्रोल झाली. एवढा मोठा स्टार तुम्हाला भेटायला आला असेल तर त्याला भेटताना तुम्ही उभं राहिलं पाहिजे, पण ही कोणती पद्धत आहे ? आराध्या बच्चन प्रत्येक इव्हेंटमध्ये ऐश्वर्यासोबतच दिसते. प्रत्येक ट्रीपला ऐश्वर्या ही लेकीला घेऊन जाते. या नव्या व्हिडीओमुळे आराध्या खूप ट्रोल झाली आहे.
फंक्शनमध्ये असं काय झालं की आराध्या झाली ट्रोल ?
कार्यक्रम कोणताही असो, आराध्या बच्चन प्रत्येक कार्यक्रमाला आई ऐश्वर्या रायसोबत हजर असते. यावेळीही असेच काहीसे पाहायला मिळाले, यामुळे ती खूप ट्रोलही झाली. या नव्या व्हिडीओवरही लोकांनी अनेक प्रश्न विचारलेत. ‘ जेव्हा बघावं तेव्हा तुम्ही फिरत असता, आराध्या शाळेत जात नाही का ?’ असा सवाल काही यूजर्सनी विचारला. तर काही लोकांनी आराध्याचे कौतुक केलं. बच्चन कुटुंबात राहणं ऐश्वर्यासाठी दिवसेंदिवस कठीण होतंय, अभिषेकही तिच्यासोबत नसतो. अशा परिस्थितीत तिची लेकच तिची बेस्ट फ्रेंड बनली आहे.
View this post on Instagram
पण चियां विक्रम सोबतचा व्हिडीओ पाहून अनेकांनी आराध्याला ट्रोल केलं. खरंतर फंक्शनमध्ये आल्यावर चियां विक्रम हा सगळ्यांना भेट होता, खुर्चीवर बसलेल्या ऐश्वर्याला पाहून तो लगेच तिच्याकडे वळला आणि तिची विचारपूस केली. आराध्याही तिच्या शेजारीच बसली होती, चियां विक्रमने तिची भेट घेतली, मात्र तो समोर आल्यावर आराध्या त्याच्याशी हसून बोलली पण खुर्चीवरून काही उठून उभी राहिली नाही. ती बसूनच होती. हा व्हिडीओ पाहून अनेकांना तिचा राग आला. ‘ ही मुलगी (आराध्या) एखाद्या अभिनेत्रीसारखं का वागत्ये ? मोठ्यांना भेटताना उभं रहावं, हिला एवढे मॅनर्स नाहीत का, एवढंही समजत नाही का ?’ अशा कमेंट्स या व्हिडीओवर अनेकांनी केल्या आहेत.
यापूर्वीही आराध्या झाली ट्रोल
ट्रोल होण्याची ही काही आराध्याची पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही तिला बऱ्याच वेळा टीकेचा सामना करायला लागलाय. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या आणि आराध्या या दोघी एअरपोर्टवर दिसल्या, तेव्हा त्यांचे फोटो काढण्यासाठी पापाराझींची एकच झुंब उडाली. मात्र तेव्हा आराध्या be careful, असं बोलली, मात्र तो टोन बऱ्याच लोकांना आवडला नाही. ती ज्या पद्धतीने बोलली तो ऐकून लोकांनी तिला खूप ट्रोल केलं. ऐश्वर्या ही आराध्याला खूप प्रोटेक्ट करते, तिला नेहमी सोबत घेऊन चालते असते. त्यावरूनही ऐश्वर्या-आराध्याला खूप ट्रोल केलं जातं, त्यांच्यावर टीका होते.
आराध्या बच्चनला ट्रोलिंगचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ नाही. वास्तविक, काही दिवसांपूर्वी पापाराझी ऐश्वर्या राय आणि आराध्याला पकडण्यासाठी पुढे गेले होते. त्यावर आराध्या लगेच म्हणाली, काळजी घ्या. पापाराझींना तो ज्या प्रकारे म्हणाला,
हातातून लग्नाची अंगठी गायब ?
दरम्यान अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सतत समोर आहेत. याच व्हिडीओमध्ये ऐश्वर्याच्या हातात लग्नाची अंगठी दिसली नाही, असे अनेक चाहत्यांनी नोटीस केल. त्यावरूही अनेकांनी चिंता व्यक्त केली. मात्र अभिषेक-ऐश्वर्याने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.