ऐश्वर्या, दीपिकाच्या बाहुल्यांचा मार्केटमध्ये धुमाकूळ; करीना कपूर का भडकली ?

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाबद्दलच्या बऱ्याच चर्चा सध्या सुरू आहे. याचदरम्यान ऐश्वर्या रायच्या बाहुल्यांचीही खूप चर्चा झाली. ऐश्वर्यापूर्वी दीपिका पदुकोण, कतरिना कैफ आणि तैमूर अली खान यांच्या बाहुल्या बाजारात आल्या आहेत.

ऐश्वर्या, दीपिकाच्या बाहुल्यांचा मार्केटमध्ये धुमाकूळ; करीना कपूर का भडकली ?
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 12:45 PM

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय आजकाल चित्रपटात फारशी दिसत नसली तरी तिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची बरीच चर्चा होत असते. गेल्या बऱ्याच दिवसांपासून ऐश्वर्या ही तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आली असून ऐश्वर्या आणि अभिषेकमधील दुरावा, त्यांच्या घटस्फोटाबद्दलच्या बातम्या सतत समोर येत असतात. पण संपूर्ण बच्चन कुटुंब तसेच अभिषेक -ऐश्वर्यानेही या विषायवर मौन काखल असून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान ऐश्वर्या राय सारख्या दिसणाऱ्या बाहुल्या काही काळापूर्वी लाँच झाल्या. राधिका आणि अनंत अंबानी यांच्या लग्नसोहळ्यासाठी ऐश्वर्या आली असताना तिने जो आऊटफिट घातला होता, त्यापासून प्रेरण घेऊन या बाहुल्यांचा लूक डिझाईन करण्यात आला आहे. सोशल मीडियावरही हे फोटो खूप व्हायरल झाले आहेत. मात्र सेलिब्रिटींच्या रुपातील बाहुल्या मार्केटमध्ये येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी बाजारात कतरिना कैफ, दीपिका पडूकोण ते तैमूर अली खान यांच्या बाहुल्याही बाजारात दिसल्या होत्या.

ऐश्वर्या रायच्या बाहुल्यांवर काय प्रतिक्रिया ?

ऐश्वर्या रायच्या बाहुल्या बाजारात आल्या असून सोशल मीडियावर बऱ्याचा प्रतिक्रिया येत आहेत. यावरून बरेच ट्रोलिंग होत आहे. अभिनेत्रीची ही बाहुली श्रीलंकन ​​कलाकार निगितेशनने बनवली आहे. ही बाहुली ऐश्वर्यासारखी दिसावी यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.काहींनी त्याच्या मेहनतीचे कौतुक केले आहे, तर काहींनी त्याच्यावर टीका केलीये. ऐश्वर्यासारखी दिसणारी ही बाहुली अनारकली सूटमध्ये असून त्यावर बऱ्याच कमेंट्स येत आहेत. बऱ्या लोकांना हा लूक आवडला नसून त्यावरून टीकाही करण्यात आली आहे. हे मंजुलिका चं अपग्रेडेड व्हर्ज आहे, अशी कमेंट एकाने केलीये.

तैमूरची डॉल पाहून करीना का भडकली ?

ऐश्वर्या रायपूर्वी करीना कपूर खान आणि सैफ अली खानचा मोठा मुलगा तैमूर अली खान यांच्या बाहुल्यांवर लोकांच्या अशाच प्रतिक्रिया होत्या. तैमूर जन्मल्यापासूनच चर्चेत असतो. स्टार किड्समध्ये तैमूरची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. तैमूरची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. तैमूरची लोकप्रियता लक्षात घेऊन त्याच्या बाहुल्याही बाजारात दाखल झाल्या. चाहत्यांना त्या खूप आवडल्या, पण त्यावरून अभिनेत्री आणि तैमूरची आई करीना कपूर खान ही मात्र चांगलीच भडकली होती.

सुमारे 5 वर्षांपूर्वी करीना एका टॉक शोमध्ये पोहोचली होती. त्याच दरम्यान तैमूरच्या बाहुल्याही बाजारत येऊ लागल्या. तेव्हा करीनाला तिच्या मुलाच्या बाहुल्यांबद्दल विचारण्यात आले. तेव्हा करीना म्हणाली होती की मला माहीत आहे पण ही बाहुली तैमूरसारखी अजिबात दिसत नाही. ती बाहुली चकीसारखी दिसते, असे ती म्हणाली होती. चकी ही एक झपाटलेली बाहुली आहे. ‘चाइल्ड्स प्ले’ या हॉरर चित्रपटात ती दिसली होती.

दीपिकाच्या बाहुलीवर मीम्सचा वर्षाव

अभिनेत्री दीपिका पडूकोण हिच्या लूकवरून प्रेरणा घेऊनही बाहुल्या तयार करण्यात आल्या. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांचा ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा लोकांना दीपिकाचा लूक खूप आवडला होता. ‘पद्मावत’ मधील तिच्या लूकवर आधारित बाहुली बाजारात आली, पण काही लोकांना त्या लकूल आवडल्या नाहीत.त्यावरूनही बरेच मीम्स बनले होते.

कतरिनाच्या बाहुलीला मिळालं प्रेम

अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच तिच्या कामापेक्षा तिच्या सौंदर्यामुळे जास्त चर्चेत असते. कतरिनाचे सौंदर्य लक्षात घेऊन मॅटेल कंपनीने तिची बार्बी डॉलही बनवली. कतरिना ही पहिली हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे जिच्यावरून प्रेरणा घेत अमेरिकन कंपनीने तिची बार्बी डॉल बनवली. कतरिनाच्या आधी हा सन्मान आंतरराष्ट्रीय अभिनेत्री मर्लिन मनरो, शकीरा, ऑड्रे हेपबर्न, हेडी क्लम आणि एलिझाबेथ टेलर यांना देण्यात आला होता. कतरिनाच्या बाहुल्या खूप सुंदर होत्या आणि लोकांना खूप आवडल्या.

जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.