Aishwrya Rai : एवढी उंच…. आईसह लेकीचं ट्विनिंग, ऐश्वर्या-आराध्याला पाहून चाहते सुखावले
सध्या नात्यातील वादामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन चर्चेत आहेत. गेल्या काही काळापासून ते वेगळं रहात असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. मात्र याचदरम्यान आता ऐश्वर्या राय आणि तिची लेक आराध्या यांचा एक फोटो व्हायरल होतोय. आपल्या आईप्रमाणेच ऐश्वर्या एकदम उंच झाल्याचं त्यामध्ये दिसत आहे.
अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबतच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्यांमुळे सध्या ऐश्वर्या राय चर्चेत आहे. दोघांमध्येही काही आलबेल नसून ते विभक्त होणार असल्याच्याही बातम्या फिरत आहेत. मात्र यावर अद्याप अभिषेक किंवा ऐश्वर्या यांच्यापैकी कोणीच काही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी ते दोघे एका पार्टीमध्ये एकत्रही दिसले होते. त्यामुळे त्यांच्यातील दुराव्याच्या बातम्या कितपत खऱ्या आहेत हे सांगणही कठीण आहे. पण आता याचदरम्यान ऐश्वर्या राय आणि तिची लेक आराध्या यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये मायलेकीची ही जोडी अतिशय सुंदर दिसत आहे. यामध्ये ऐश्वर्याची आई, आराध्याची आजी वृंदा रायही त्यांच्यासोबत दिसल्या.
मात्र हा फोटो व्हायरल होताच अनेकांचे लक्ष फक्त आराध्यावर होतं. ती आता हुबेहुब आईसारखी दिसू लागली असून तेवढीच उंचही झाली आहे. आराध्याचे हे रुप, उंची पाहून चाहतेही एकदम हैराण झाले असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहे. ऐश्वर्या रायच्या फॅन पेजवर काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. आराध्या तिच्या आईसारखीच उंच झाल्याचे त्यामध्ये दिसत आहे.
ऐश्वर्यासारखीच उंच झाली आराध्या
ऐश्वर्या राय आणि आराध्याचे फोटो पाहिल्यानंतर चाहते त्यांचे खूप कौतुक करत आहेत. एका फोटोमध्ये ऐश्वर्या राय गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे. मिनिमम मेकअप असूनही ती खूपच सुंदर दिसत होती. गुलाबी लिपस्टीक आणि हेवी ईअररिंग्स घातलेली, केस मोकळे सोडलेली ऐश्वर्या अप्रतिम दिसत होती. तर तिच्या शेजारीच उभी असलेली तिची लेक आराध्या ही ऑफ व्हाईट रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. तिनेही केस मोकळे सोडले होते आणि आईप्रमाणेच पण थोडी हलकी गुलाबी लिपस्टीक लावली. या फोटोंमध्ये आराध्याच्या शेजारी निळ्या रंगाच्या साडीत तिची आजी आणि ऐश्वर्या रायची आई वृंदा रायसोबत दिसत आहे. तिघीही हसतमुखाने फोटोसाठी पोझ देत होत्या.
The most beautiful ladies ♥️
Aish Aaru and her mom at a wedding tonight 💯💫😘#AishwaryaRai #Aaradhyabachanchan pic.twitter.com/1hzqfWE35F
— AISHWARYA RAI 💙 (@my_aishwarya) December 6, 2024
गेल्या महिन्यातच साजरा केला 13 वा वाढदिवस
ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांची लेक आराध्याचा गेल्या महिन्यात 13 वा वाढदिवस होता. तिने लेकीचे बरेच फोटो शेअर केले होते. आराध्याच्या लहानपणापासूनचे ते फोटो खूप सुंदर होते, त्यावर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव करत आराध्याला शुभेच्छाही दिल्या होत्या.