Ajay Devgn | अजय देवगणचा आणखी एक धमाका, ‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ ओटीटीवर प्रदर्शित होणार!

यंदा स्वातंत्र्य दिन रविवारी येत असून, हा चित्रपट 13 ऑगस्टला प्रदर्शित होऊ शकतो असे देखील बोलले जात आहे. तथापि, याबद्दल अद्याप कोणतीही खात्रीशीर माहिती देण्यात आलेली नाही.

Ajay Devgn | अजय देवगणचा आणखी एक धमाका, ‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ ओटीटीवर प्रदर्शित होणार!
अजय देवगण
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 2:57 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn)  याच्या ‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ (Bhuj : The Pride Of India )या चित्रपटाची चाहत्यांना बरीच प्रतीक्षा आहे. आता या चित्रपटासंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. यावर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. तथापि, हा चित्रपट चाहत्यांना चित्रपटगृहात नाही तर, ओटोटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. वास्तविक, रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि डिस्ने प्लस हॉटस्टारच्या टीमने एकत्रितपणे असा निर्णय घेतला आहे की, ‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ या स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होईल (Ajay Devgn upcoming film Bhuj The Pride Of India will release on OTT platform).

निर्मात्यांना वाटते की, हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी तीच योग्य वेळ असेल. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लोकांना पुन्हा एकदा इतिहासाची माहिती घेण्याची संधी मिळणार आहे. निर्मात्यांचा असाही विश्वास आहे की, अजयचा हा चित्रपट ओटीटीवर नवीन विक्रम स्थापित करू शकतो.

यंदा स्वातंत्र्य दिन रविवारी येत असून, हा चित्रपट 13 ऑगस्टला प्रदर्शित होऊ शकतो असे देखील बोलले जात आहे. तथापि, याबद्दल अद्याप कोणतीही खात्रीशीर माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत मेकर्स आणि अजय यांचे कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. अजय देवगण व्यतिरिक्त या चित्रपटात संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही, शरद केळकर आणि अ‍ॅमी विर्क महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

अशी आहे चित्रपटाची कहाणी

‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ची कथा 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. ज्यामध्ये त्या वेळी भुज विमानतळाचे प्रभारी असलेले आयएएफ स्कॅड्रॉन लीडर विजय कर्णिक यांनी 300 स्थानिक महिलांच्या मदतीने एअरबेसची पुनर्बांधणी केली होती. या चित्रपटात हवाई दलाची शक्ती आणि पराक्रम दाखवण्यात येणार आहे (Ajay Devgn upcoming film Bhuj The Pride Of India will release on OTT platform).

‘रुद्र’द्वारे वेब विश्वात पदार्पण

चित्रपटांमध्ये आपली जादू विखुरल्यानंतर, अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आता ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये धमाका करण्यास सज्ज झाला आहे. ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर ‘रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ (Rudra The Edge of Darkness) नावाची एक क्राईम ड्रामा सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अजय देवगण या सीरीजमधून ओटीटीवर डेब्यू करत आहे. हॉटस्टारच्या या स्पेशल सीरीजची निर्मिती सध्या जोशात सुरू असून, मुंबईतील बर्‍याच आयकॉनिक लोकेशन्समध्ये या सीरीजची शूटिंग होणार आहे. बर्‍याच चित्रपटांत पोलिसांची भूमिका साकारणारा अजय देवगण आता एक नवीन आणि प्रखर पोलीस अधिकारी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ही एक वेगळी कॉप स्टोरी असेल ज्याची कथा आणि कथेचे स्वरुप खूप वेगळे असेल. यातून अजय ‘रुद्र’च्या अवतारात मोठा धमाका करणार आहे. या थ्रिलर आणि क्राईम ड्रामात अजयला पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत. ही नवी वेब सीरीज लोकप्रिय ब्रिटीश मालिका ‘लूथर’वरून प्रेरित आहे.

(Ajay Devgn upcoming film Bhuj The Pride Of India will release on OTT platform)

हेही वाचा :

‘पापा’ सैफसह शेतात काम करतोय चिमुकला तैमूर, करीनाने शेअर केले खास फोटो!

Video | सामन्यादरम्यान अनुष्काला ‘फ्लाईंग कीस’ तर मुलीच्या नावे अर्धशतक, विराटने जिंकली चाहत्यांची मनं, पहा व्हिडीओ…

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.