छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट बनवणार, निर्माते अजित शिरोळेंची दमदार तयारी!
दिग्दर्शक अजित शिरोळे या प्रोजेक्टला आपला ड्रीम प्रोजेक्ट म्हणतात. त्याविषयी बोलताना ते म्हणाले, हा माझा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या चित्रपटाची कथा तयार करण्यासाठी मी 1 दशकाहून अधिक काळ व्यतीत केला आहे.
मुंबई : देशभरात वेबसीरीज आणि चित्रपटांचा ट्रेंड आता वेगाने वाढताना दिसत आहे. सद्य दिवसांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. दर दिवशी एखादा नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू होत आहे. याच दरम्यान आता छत्रपती संभाजी महाराजांवर (Chhatrpati Sambhaji Maharaj) चित्रपट बनवण्याच्या तयारी आता पूर्ण झाल्याचे कळते आहे. छत्रपती संभाजी महाराज मराठा साम्राज्याचे राजे आणि छत्रपती शिवाजी महाराज पुत्र होते. त्यांची कहाणी आता या चित्रपटाद्वारे लोकांसमोर सदर केली जाणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘शिवपुत्र संभाजी’ असे असणार आहे (Ajit Shirole Making film on Chhatrpati Sambhaji Maharaj).
अजित शिरोळे (Ajit Shirole) हा चित्रपट दिग्दर्शित-निर्मित करणार आहेत. या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. बॉलिवूडमध्ये संजय लीला भन्साळी आणि आशुतोष गोवारीकर ऐतिहासिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे आता दिग्दर्शक अजित शिरोळे यांनीही त्यांच्या इतकाच मोठा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट असणार आहे. याआधी त्यांनी 13 मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ज्यानंतर त्यांनी आता बॉलिवूडमधील एन्ट्रीबद्दल विचार केला आहे. चित्रपटाची घोषणा आणि पोस्टर पाहिल्यानंतर लोकांमध्ये या चित्रपटाविषयीचा उत्साह वाढला आहे.
दिग्दर्शकाचा ड्रीम प्रोजेक्ट
दिग्दर्शक अजित शिरोळे या प्रोजेक्टला आपला ड्रीम प्रोजेक्ट म्हणतात. त्याविषयी बोलताना ते म्हणाले, “हा माझा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या चित्रपटाची कथा तयार करण्यासाठी मी 1 दशकाहून अधिक काळ व्यतीत केला आहे. या चित्रपटासाठी मी अनेक ऐतिहासिक कागदपत्रे, पुस्तके, कादंबरी, बखर इत्यादी वाचल्या आहेत. मला आठवत आहे, 10 वर्षांपूर्वी मी जेव्हा हॉलिवूड चित्रपट ‘300’ पाहिला तेव्हा या चित्रपटाच्या विशेष प्रभावांनी मला खूप आकर्षित केले आणि त्यानंतर मी त्याच प्रकारच्या प्रभावांनी भव्य चित्रपट बॉलिवूडमध्येही असाच चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला.”( Ajit Shirole Making film on Chhatrpati Sambhaji Maharaj)
महाराजांकडून मिळते प्रेरणा
दिग्दर्शक पुढे म्हणाले की, “मी संभाजी महाराजांवर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला, कारण मी त्यांच्याकडून नेहमीच प्रभावित झालो होतो. छत्रपती संभाजी महाराज एक अतिशय हुशार, सामर्थ्यवान आणि शूर राजा होते. अगदी लहान वयातच त्यांनी बर्याच भाषांचे ज्ञान घेतले होते. इतर भाषांपैकी संभाजी महाराजांनाही संस्कृत भाषेचे चांगले ज्ञान होते. संभाजी महाराजांना लोकनेते म्हणतात. वडिलांप्रमाणे छत्रपती संभाजी राजे यांनीही स्वराज्याचे स्वप्न पाहिले होते आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येक महत्त्वपूर्ण प्रयत्न केले होते.”
लवकरच चित्रीकरण करणार सुरु
धनराज प्रॉडक्शनच्या सहकार्याने शिवानी चित्रपटाच्या बॅनरखाली ‘शिवपुत्र संभाजी’ तयार करण्यात येणार आहे. हा चित्रपट 4 भाषांमध्ये बनवला जाईल. सुमारे 100 चित्रपट आणि मालिका, ऐतिहासिक लेखनात पारंगत मराठी चित्रपटाचे कुशल लेखक प्रताप गंगावणे यांनी हा चित्रपट लिहिला आहे. ‘राजा शिव छत्रपती’, ‘स्वराज्य जननी जिजामाता’, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’, ‘बाजीराव मस्तानी’ या मालिका त्यांनी लिहिल्या आहेत. लॉकडाऊन संपताच या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करणार असल्याचे दिग्दर्शकानी सांगितले आहे. या चित्रपटाचे शूटिंग रायगड, तुलापूर, संगमेश्वर अशा ऐतिहासिक ठिकाणी केले जाईल.
(Ajit Shirole Making film on Chhatrpati Sambhaji Maharaj)
हेही वाचा :
Timeless | थोडक्यात हुकला व्ही. शांतारामांचा प्रयत्न, अन्यथा ‘हा’ ठरला असता पहिला रंगीत चित्रपट!
‘थलैवा’ रजनीकांत कोविड पीडितांसाठी मैदानात; मुख्यमंत्री मदतनिधीत दिली एवढी रक्कम
The Family Man 2 : मनोज बाजपेयीचा अॅक्शन पॅक ‘द फॅमिली मॅन 2’ ‘या’ दिवशी रिलीज होणार, ट्रेलरही लवकरच भेटीला येणार!#TheFamilyMan2 | #manojbajpayee | #Entertainment https://t.co/XIJfpp520w
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2021