मुंबई : बॉलिवूडचा अॅक्शन स्टार अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) प्रकृतीविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर अक्षय कुमारची प्रकृती सध्या काहीशी खालावली आहे. तर, पुढील उपचारासाठी अक्षय कुमारला पवईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अक्षय कुमारने स्वत: इन्स्टाग्राम पोस्टद्वारे याची पुष्टी केली आहे. केवळ अक्षय कुमार नाही तर, ‘राम सेतु’ चित्रपटाशी संबंधित 45 कनिष्ठ कलाकारांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे (Akshay Kumar Addmitted in hospital for corona treatment).
अक्षय कुमार याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “तुमच्या सर्व शुभेच्छा आणि प्रार्थनांबद्दल धन्यवाद, त्या सगळ्या खरंच काम करत आहेत. मी आता बरा आहे, परंतु वैद्यकीय सल्ल्यानुसार खबरदारी म्हणून मी रुग्णालयात दाखल होत आहे. मला लवकरच घरी परत येण्याची आशा आहे. काळजी घ्या.’
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती होती. “आज सकाळी माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी सध्या घरातच क्वारंटाईन आहे. तसेच डॉक्टरांनी दिलेले सर्व उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्या. तसेच शक्य असल्यास कोरोना चाचणी करुन घ्यावी. Back in Action Very Soon,” असे ट्वीट अक्षय कुमार याने केले होते (Akshay Kumar Addmitted in hospital for corona treatment).
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारपाठोपाठ त्याच्या तब्बल 45 सहकलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व कलाकार अक्षय कुमारचा आगामी चित्रपट राम सेतू यातील आहेत. त्यामुळे राम सेतू चित्रपटाच्या सेटवर कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळत आहे. यामुळे या चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राम सेतू या चित्रपटाची शूटींग मड आयलँडला होत आहे. या शूटींगसाठी काल (5 एप्रिल) 100 नवीन ज्युनिअर आर्टिस्ट काम सुरु करणार होती. मात्र कोरोना चाचणी बंधनकारक असल्याने त्या सर्वांची चाचणी करण्यात आली. यावेळी त्यातील 45 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिनेइम्प्लॉईजने (FWICE) दिलेल्या माहितीनुसार, राम सेतू या चित्रपटाच्या टीमने पूर्ण खबरदारी घेतली होती. मात्र दुर्देवाने 45 ज्युनिअर आर्टिस्टला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे (Akshay Kumar Addmitted in hospital for corona treatment).
अक्षय कुमारसोबत 45 ज्युनिअर आर्टिस्टला कोरोनाची लागण झाल्याने चित्रपटाचे शूटींग पुढे ढकलण्यात आलं आहे. जवळपास 13 ते 14 दिवसांनंतर या चित्रपटाचे शूटींग पुन्हा सुरु होणार आहे. दरम्यान अक्षय कुमारला कोरोनाची लागण होण्यापूर्वी तो या चित्रपटाच्या सेटवर शूटींग करत होता.
विशेष म्हणजे या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान बरीच सावधानता बाळगली गेली होती. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान कोरोना चाचणी करणे गरजेचे करण्यात आले होते. यातील अनेकांना शूटींगपूर्वी काही दिवस आयसोलेट केलं जाते. मात्र या दरम्यान त्या कलाकारांचे पैसे कापले जात नाही. तसेच जरी सेटवर कोणाची तब्येत बिघडली तरी त्यांना अलगीकरणात ठेवले जाते. तसेच अनेकांना या ठिकाणी पीपीई किट देण्यात आले आहेत.
दरम्यान अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी अॅक्शन-अॅडव्हेंचर असलेल्या राम-सेतू या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात केली होती. या चित्रपटात अक्षय पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणून भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा पहिला लूक त्याने नुकतंच शेअर केला होता. माझ्यासाठी सर्वात खास चित्रपट बनवण्याचा प्रवास आजपासून सुरू होत आहे. राम सेतुचे शुटिंग सुरू! मी चित्रपटात पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे. माझ्या या लूकवर आपले विचार ऐकायला मला आवडतील…हे माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचे आहे.’ अशी पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर केली होती.
राम सेतू हा चित्रपट अभिषेक शर्मा दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री नुसरत भरुचा आणि जॅकलिन फर्नांडिसही दिसणार आहे.
(Akshay Kumar Addmitted in hospital for corona treatment)
Akshay Kumar Corona | Back in Action Very Soon! बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण
Akshay Kumar | अक्षय कुमारने सुरु केले ‘राम सेतु’चे चित्रीकरण, लूकविषयी सांगताना म्हणाला…