Army day: अक्षय कुमार आणि क्रिती सेनॉन जैसलमेरमध्ये, वीर जवानांना अभिवादन

अक्षय कुमार आणि क्रिती सॅनॉन यांनी जैसलमेरमध्ये सैनिकांची भेट घेतली. (Akshay Kumar and Kriti Sanon in Jaisalmer, greetings to the brave soldiers)

Army day: अक्षय कुमार आणि क्रिती सेनॉन जैसलमेरमध्ये, वीर जवानांना अभिवादन
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 5:08 PM

मुंबई: सैन्य दिनाच्या निमित्तानं शुक्रवारी अभिनेता अक्षय कुमार आणि क्रिती सेनॉन यांनी जैसलमेरमध्ये सैनिकांची भेट घेतली. बच्चन पांडे या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अक्षय आणि कृती जैसलमेरमध्ये आहेत. चित्रपटाच्या शूटिंमधून वेळ काढत कलाकार सैनिकांपर्यंत पोहोचले. अक्षय आणि क्रिती व्यतिरिक्त चित्रपटाची संपूर्ण टीमही सैनिकांच्या भेटीसाठी पोहोचली होती. नाडियाडवाला ग्रँडसन यांनी फोटो शेअर करत भारतीय सेनेबरोबर सेलिब्रेट आर्मी डे. सेलिब्रेट केला असल्याचं सांगितलं.

यावेळी, अक्षय कुमारनं जवानांसोबत व्हॉली बॉल खेळला. ‘आर्मी डे फ्लॅग ऑफच्या निमित्तानं काही जवानांसोबत व्हॉली बॉल सामना खेळला आहे.’ असं कॅप्शन देत अक्षयनं व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

काही दिवसांपूर्वीच अक्षयनं बच्चन पांडे या चित्रपटातील आपल्या लूकचे फोटो शेअर केले होते. ‘नवीन वर्ष, जुने असोसिएशन, बच्चन पांडेचं शूटिंग सुरू झालं. साजिद नाडियाडवाला सोबत हा माझा दहावा चित्रपट आहे आणि मी पुढेही अनेक चित्रपट करणार अशी आशा ठेवतो. तुमच्या शुभेच्छांची गरज आहे आणि मला सांगा माझा माझा हा लूक कसा वाटला ? ‘ असं कॅप्शन देत अक्षयनं त्याचा पहिला लूक शेअर केला होता.अक्षय कुमारचा  ‘बच्चन पांडे’ चित्रपटातील नवा लूक पाहून सर्वत्र त्याच्या लूक बद्दल चर्चा सुरु होती. या चित्रपटात अक्षयच्या गळ्यात मोठी चैन आणि काळी लुंगी घातलेली दिसत आहे. त्याच्या कपाळावरती चंदनचा टीळा आहे. तसेच अक्षयच्या हातात नान चाक दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

या चित्रपटात अक्षय एका गँगस्टरच्या भूमिकेत तर क्रिती पत्रकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. बच्चन पांडे हा चित्रपट 2021मध्ये रिलीज होईल. या चित्रपटात अरशद वारसी आणि पंकज त्रिपाठीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.

साजिद नाडियाडवाला यांच्या ‘बच्चन पांडे’ या मोठ्या चित्रपटाचं शूटिंग 6 जानेवारीपासून सुरू झालं आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कृती सेनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अरशद वारसी, जॅकलिन फर्नांडिस, पंकज त्रिपाठी असे स्टारही या चित्रपटात दिसणार आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बच्चन पांडे चित्रपटाची संपूर्ण टीम जैसलमेरला रवाना झाली आहे, जिथे चित्रपटाचे शूटिंग 6 जानेवारीपासून सुरू झालं.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...