Akshay Kumar | पंकज त्रिपाठी यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, अक्षय कुमार याने शेअर केली भावनिक पोस्ट

अभिनेत्री पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांबद्दलची मोठी बातमी पुढे आली. पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. पंकज त्रिपाठी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांच्या निधनाची बातमी कळताच पंकज त्रिपाठी यांनी गावी धाव घेतली आहे.

Akshay Kumar | पंकज त्रिपाठी यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, अक्षय कुमार याने शेअर केली भावनिक पोस्ट
Updated on: Aug 21, 2023 | 7:57 PM

मुंबई : अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे आज निधन झाले आहे. 98 वर्षी पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या वडिलांनी शेवटचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनाची बातमी कळताच गोपालगंजकडे पंकज त्रिपाठी हे रवाना झाले आहेत. पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे स्वप्न होते की, पंकज यांनी डाॅक्टर होऊन समाजाची सेवा करावी. पंकज त्रिपाठी हे बऱ्याच वेळा वडिलांसोबत फोटो शेअर करताना देखील दिसत असत. अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा नुकताच रिलीज झालेला ओएमजी 2 मध्ये पंकज त्रिपाठी महत्वाच्या भूमिकेत होते.

वडिलांच्या निधनानंतर पंकज त्रिपाठी यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याचे बघायला मिळतंय. पंकज त्रिपाठीच्या वडिलांची बातमी कळताच आता अक्षय कुमार याने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत दु:ख व्यक्त केल्याचे बघायला मिळत आहे. अक्षय कुमार याने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहते देखील मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

अक्षय कुमार याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘माझा अत्यंत जवळचा मित्र आणि सहकारी कलाकार पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी कळताच मी खूप दुःखी झालो आहे. आपल्या पालकांची उणीव कोणीही भरून काढू शकत नाही…ईश्वर त्यांच्या वडिलांच्या आत्म्यास चरणी स्थान देवो… ओम शांती…

आता अक्षय कुमार याने शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. कामानिमित्त जरी पंकज त्रिपाठी मुंबईमध्ये स्थायिक झाले असतील. मात्र, वडिलांसोबत एक छान नात पंकज त्रिपाठीचे नक्कीच होते. वडिलांना भेटण्यासाठी कायमच गोपालगंजला पंकज त्रिपाठी जात असत.

अनेकदा पंकज त्रिपाठी हे आपल्या वडिलांबद्दल मुलाखतीमध्ये बोलताना देखील दिसले आहेत. चित्रपट निर्माता कमलेश मिश्रा आणि अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वीच मोठा वाद हा बघायला मिळाला. इतकेच नाहीतर दोघांनीही एकमेकांना कायदेशीर नोटीस देखील पाठवल्या होत्या.