“तेच डोळे, तीच स्टाईल….” अक्षय कुमारच्या मुलाला पाहिलंत का? सेम टू सेम राजेश खन्नांची कॉपी
अक्षय कुमारच्या मुलाचा आरवचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून आरव हा राजेश खन्ना यांच्यासारखा दिसत असल्याचं म्हटलं जात आहे. नेटकरी त्याच्या स्टाईल आणि लूकचे कौतुक करत आहेत.

बॉलिवूडमधील 70s,80s चा काळ गाजणारे अभिनेते राजेश खन्ना म्हणजे बॉलिवूडची जान होते. त्यांच्या स्टाईलपासून ते अभिनयापर्यंत सर्वचजण त्यांचे चाहते होते.त्यांच्या चित्रपटांनी तर सर्वांच्या मनावर राज्य केलं. त्यांच्या चित्रपटातील गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहेत. पण तुम्हाला माहितीये त्यांचा जावई तथा अभिनेता अक्षय कुमारचा मुलगा हा सेम टू सेम आजोबांची कॉपी असल्याचं म्हटंल जातं आहे.
अक्षय कुमारच्या मुलाचा एक व्हिडीओ व्हायरल
अक्षय कुमारच्या मुलाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओवरून अक्षय कुमारचा मुलगा आरव हा राजेश खन्ना यांच्यासारखाच दिसतो असं म्हटलं जातं आहे. अक्षय कुमारचा मुलगा आरव कुमार एका पार्टीतून परतताना मीडियाने त्याचा व्हिडीओ काढला. यावेळी, तो एका मिस्ट्री गर्लसोबत होता. तो त्याच्या कारमध्ये बसताना त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तसेच तो यावेळी खूप खूश दिसत असून तो हसतानाही दिसत आहे. आरवचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्याच्या या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळी प्रतिक्रिया दिली आहे.
आरवची स्टाइल सर्वांच्या नजरेत भरणारी
खरंतर, आरवच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तो अक्षय कुमारची भाची सिमर भाटियासोबत दिसत आहे. दोघेही हुमा कुरेशीच्या ईद पार्टीत पोहोचले होते. व्हिडिओमध्ये आरव खूपच हँडसम दिसत होता. या व्हिडीओमध्ये त्याने काळ्या रंगाचा पोषाख घातलेला दिसत असून त्याच्या हातात गजराही गुंडाळलेला दिसत होता. आरवने पापाराझींना हसत हसत फोटोंसाठी अनके पोझही दिल्या. यावेळी तो सिमर भाटियाशी बोलतानाही दिसत आहे. आरवला पाहिल्यानंतर, वापरकर्ते त्याच्या लूक, त्याच्या स्टाइलचे आणि त्याच्या स्माइचे कौतुक करताना दिसत आहे.
View this post on Instagram
‘सेम टू सेम’ तो आजोबांची कॉपी
आरवला पाहिल्यानंतर, वापरकर्त्यांनी त्याच्या लूकचे कौतुक करत तो ‘सेम टू सेम’ तो आजोबांची कॉपी दिसत असल्याचं म्हटलं जातं आजोबा राजेश खन्ना यांच्याशी करायला सुरुवात केली. एका युजर्सने लिहिले होते की, ‘तो राजेश खन्ना जीची कॉपी आहे.’ दुसऱ्या एका युजरने लिहिलेल आहे की, ‘तो अगदी राजेश खन्ना यांच्यासारखाच दिसतोय’, तर तिसऱ्याने लिहिलं की, ‘आरव अक्षय कुमारपेक्षा राजेश खन्नांसारखा दिसतो “एका युजरने तर असेही म्हटलं की ‘आरवने हॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावावं”. असं म्हणत त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण करावं असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
पण अक्षयचा मुलगा आरव अभिनयात करिअर करू इच्छित नाही. एका मुलाखतीत अक्षयने याबद्दल सांगितलं होतं, आरवला अभिनय आणि चित्रपटांमध्ये अजिबात रस नाही. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्यांची मुले म्हणजे स्टार किड्सच्या आयुष्यात काय चाललं? आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण खूप उत्सुक असतो. मात्र ही मुले बॉलिवूडमध्ये येण्याआधीच प्रसिद्धीच्या झोतात राहतात.