अक्षय कुमार अॅक्शन स्टंट करताना जखमी; डोळ्यावर जोरात वस्तू आदळल्याने गंभीर दुखापत

अभिनेता अक्षय कुमारला गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. हाऊसफुल 5 च्या सेटवर स्टंट करत असताना अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत झाली आहे.

अक्षय कुमार अॅक्शन स्टंट करताना जखमी; डोळ्यावर जोरात वस्तू आदळल्याने गंभीर दुखापत
Follow us
| Updated on: Dec 12, 2024 | 9:12 PM

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार त्याच्या स्टाईल आणि चित्रपटांसाठी तसेच त्याच्या स्टंट सीन शूटसाठी प्रसिद्ध आहे. पण स्टंट करणं त्याच्या जीवावर बेतलं आहे. एका चित्रपटाच्या सेटवर स्टंट करत असताना अक्षय कुमारला गंभीक दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.

हाऊसफुल 5 च्या सेटवर स्टंट करताना दुखापत

हाऊसफुल 5 च्या सेटवर स्टंट करत असताना अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. शूटिंगच्या शेवटच्या टप्प्या शूट करताना हा अपघात घडला. रिपोर्टनुसार स्टंट दरम्यान अक्षयच्या डोळ्यावर एक वस्तू आदळल्याने अपघात घडला. अपघात घडताच सेटवर ताबडतोब एका डॉक्टरांनाही बोलावण्यात आलं, ज्यांनी लगेचच अक्षयच्या डोळ्यांवर उपचार करत डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्याला विश्रांती घेण्यास सांगितलं.

आरामानंतर पुन्हा शुटींगवर परतणार

अक्षय कुमारला झालेल्या दुखापतीमुळे तो विश्रांती घेत असून इतर कलाकारांसोबत शूट पुन्हा सुरू झालं. दुखापतीनंतर काही दिवस आराम घेऊन अक्षय लवकरच शूटिंगमध्ये सामील होईल असं सांगण्यात आलं आहे. कारण चित्रपट शूटिंगच्या अंतिम टप्प्यात आहे आणि त्याला उशीर होऊ नये अशी त्याची इच्छा आहे. दरम्यान अक्षय कुमारला झालेल्या दुखापतीची बातमी व्हायरल होताच त्याच्या चाहत्यांना त्याच्याबद्दल चिंता व्यक्त करत काळजी घेण्याची विनंती केली होती.

अभिषेक बच्चन, श्रेयस तळपदे, चंकी पांडे, जॅकलीन फर्नांडिस आणि नर्गिस फाखरी यांच्या पुनरागमनासह अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांचा आगामी कॉमेडी हाऊसफुल 5 प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. यामध्ये फरदीन खान, डिनो मोरिया, जॉनी लीव्हर, संजय दत्त, नाना पाटेकर, सोनम बाजवा, चित्रांगदा सिंग, सौंदर्या शर्मा आणि ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ असणार आहेत.

अक्षयकडे पाइपलाइनमध्ये अनेक चित्रपट

तरुण मनसुखानी दिग्दर्शित, ‘हाऊसफुल 5’ 6 जून 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हाऊसफुल 5 व्यतिरिक्त, अक्षयकडे पाइपलाइनमध्ये अनेक चित्रपट लाइनअप आहे. हेरा फेरी 3, वेलकम टू द जंगल आणि जॉली एलएलबी 3 मधील त्याच्या प्रसिद्ध भूमिकांची पुनरावृत्ती करताना तो दिसणार आहे.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....