कुटुंबीयांना सोडून ओशोंच्या आश्रमात राहणारे विनोद खन्ना घरी का परतले? लेक अक्षयने सांगितलं कारण
विनोद खन्ना आणि ओशो यांच्यातील नाते, तसेच कुटुंब सोडून विनोद खन्ना जेव्हा ओशोंच्या आश्रमात गेले होते तेव्हा काय परिस्थिती होती. तसेच ओशोंच्या आश्रमातून कधीही न परतन्याची शपथ घेतलेले विनोद खन्ना मग भारतात कसे आले. यासर्वांबद्दल त्यांचा मुलगा तथा अभिनेता अक्षय खन्नाने याबद्दलचे सर्व खुलासे केले आहेत.

‘छावा’ चित्रपटामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलेला अभिनेता अक्षय खन्नाची आज सर्वत्र चर्चा आहे. त्याने साकारलेली औरंगजेबाची भूमिका आणि त्याने केलेला अभिनय याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. अक्षय खन्ना फार अवॉर्ड फक्शन किंवा कोणत्याही बॉलिवूड पार्टीला फार हजेरी लावताना दिसत नाही. त्यामुळे त्याच्या खासगी आयुष्याबद्दल फार काही कोणाला माहित नाही.
यशस्वी करिअर, कुटुंब सोडून ओशोंचे शिष्य बनले
पण त्याने दिलेल्य काही मुलाखतींमधून त्याच्याबद्दल, त्याच्या कुटुंबाबद्दल बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे त्याचे वडील विनोद खन्ना आणि ओशो यांचं कनेक्शन. विनोद खन्ना हे ओशोंना गुरु मानायचे. 1982 मध्ये जेव्हा त्यांचे वडील विनोद खन्ना यांनी त्यांचे यशस्वी करिअर आणि कुटुंब सोडून आध्यात्मिक गुरू ओशो (आचार्य रजनीश) यांचे शिष्य बनले. तेव्हा अक्षय खन्ना फक्त पाच वर्षांचा होता. तेव्हा विनोद खन्ना ओशोच्या कम्यूनमध्ये राहण्यासाठी ओरेगॉन,अमेरिका येथे गेले होते. लहानपणी अक्षयला त्याच्या वडिलांचा हा निर्णय पूर्णपणे समजला नव्हता, पण जसजसा तो मोठा होत गेला आणि ओशोंबद्दल वाचत गेला तसतसं त्याला त्याच्या वडिलांची मानसिकता खोलवर समजली.
“माझ्या विचारांशी ओशोचा काहीही संबंध नव्हता…”
काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत अक्षय खन्नाने याबद्दल मोकळेपणाने सांगितले होते. तो म्हणाला होता की, ‘मला वडील का नाहीत याबद्दलच्या माझ्या विचारांशी ओशोचा काहीही संबंध नव्हता. तो खूप नंतर आला. जसजसे तुम्ही मोठे होता, कदाचित 15 किंवा 16 वर्षांचे झाल्यावर, तुम्ही त्या व्यक्तीबद्दल म्हणजे ओशोंबद्दल शिकायला, ऐकायला किंवा वाचायला सुरुवात करता.आता मी ते समजू शकतो”
अक्षयने पुढे म्हटलं होतं की, त्याच्या वडिलांनी केवळ एक यशस्वी कारकीर्द होती आणि त्यासाठी त्यांनी कुटुंब सोडले नाही तर एका नवीन मार्गावर चालण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्यही सोडले. अक्षय खन्ना म्हणाला, ‘फक्त कुटुंब सोडून जात नाही तर ‘सन्यास’ घेणं देखील.’ संन्यास म्हणजे तुमचे जीवन पूर्णपणे सोडून देणे. कुटुंब हा त्याचा फक्त एक भाग आहे. हा एक आयुष्य बदलणारा निर्णय होता जो विनोद खन्नाला त्यावेळी घ्यावा लागला आणि पाच वर्षांचा असताना ते अक्षयला समजणे अशक्य होतं. असही त्याने म्हटलं आहे.
अक्षयला त्याच्या वडिलांचा निर्णय स्वीकारणे सोपे झाले कारण
अक्षयला त्याच्या वडिलांचा निर्णय स्वीकारणे सोपे झाले जेव्हा त्याला समजलं की त्याच्यात काहीतरी खोल बदल झाला असेल, ज्यामुळे त्याला असा निर्णय घेण्याची प्रेरणा मिळाली. तो म्हणाला जेव्हा तुमच्याकडे आयुष्यात सर्वकाही असतं. तेव्हा असा निर्णय घेणे कठीण होते, पण या निर्णयांवर टिकून राहणे देखील महत्त्वाचे आहे.
विनोद खन्ना ओशोंच्या आश्रमातून पुन्हा भारतात, संसारात का आले?
पण मग नंतर विनोद खन्ना ओशोंच्या आश्रमातून पुन्हा भारतात, संसारात का आले? याबद्दलही अक्षयने सांगितलं. तो म्हणाला, ” जेव्हा ओशो आणि त्याच्या समुदायाचा अमेरिकन सरकारशी संघर्ष सुरू झाला तेव्हा ते (विनोद खन्ना) भारतात परतले. या घटनेनंतर अनेक लोक अखेर ओशोंच्या आश्रयातून बाहेर आले.पण जर कम्यून बरखास्त झालं नसतं, तर ते कधीही परत आले नसते” अशा पद्धतीने अक्षयने त्याच्या वडिलांबद्दलच्या अध्यात्माची माहिती दिली होती.
1987 मध्ये विनोद खन्ना घरी परतले
भारतात परतल्यानंतर विनोद खन्ना यांनी मुकुल आनंद यांच्या ‘इंसाफ’ 1987 या चित्रपटातून चित्रपटांमध्ये पु्न्हा नवीन सुरुवात केली. पण ते त्यांचे गमावलेले स्टारडम परत मिळवू शकले नाही. परतल्यानंतर त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत बॉलिवूडचा सोडले नाही. आणि अखेर 2017 मध्ये त्यांनी कर्करोगाशी झुंज देत जगाचा निरोप घेतला.