आपका बेटा परेशान करता है, आलिया भट्टने कोणाकडे केली तक्रार ? Video व्हायरल
Alia Bhatt Viral Video : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट कुठेही गेली तरी लोकांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या असतात. दरम्यान, आलियाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्याने सर्वांची मनं जिंकली आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)तिच्या नवनवीन कामगिरींमुळे खूप चर्चेत आहे. अलीकडेच आलियाने मेट गाला 2023 (Met Gala 2023) मध्ये पदार्पण केले. मोत्यांनी जडवलेल्या पांढऱ्या गाऊनमध्ये रेड कार्पेटवर आलेली आलिया अतिशय सुंदर दिसत होती. फॅशन डिझायनर प्रबल गुरुंग यांनी डिझाइन केलेला ड्रेस तिने परिधान केला होता. या मोठ्या फॅशन इव्हेंटमध्ये अभिनेत्रीने स्वतःचे सुंदर प्रतिनिधित्व केले. सगळ्यांच्या नजरा फक्त आलिया भट्टवर होत्या. अभिनेत्रीला पाहून जणू काही राजकन्या कार्यक्रमाला आल्याचा भास झाला. आता या कार्यक्रमानंतर आलिया भट्टचा एक नवीन व्हिडिओ (viral video) समोर आला आहे.
खरंतर, आलिया भट्टचा एक अतिशय क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आलिया कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. पण तिच्या कपड्यांपेक्षाही तिच्या वागण्याने लोकांची मने जिंकली आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की पापाराझी आलिया भट्टचे फोटो कॅप्चर करण्यास सुरुवात करतात. दरम्यान, आलियाची नजर एका फोटोग्राफरच्या आईकडे गेली. आलियाने प्रेमळ स्मितहास्य करत त्या महिलेकडे गेली.
View this post on Instagram
नंतर आलिया त्या फोटोग्राफरच्या आईशी संवाद साधला, काही फोटोजही काढले. इतकेच नाही तर या व्हिडिओचा मजेदार भाग म्हणजे, आलियाने त्या फोटोग्राफरच्या आईकडे तिच्या मुलाबद्दल तक्रारही केली. खरंतर आलिया म्हणाली, की आंटी तुमचा मुलगा (फोटोग्राफर) खूप त्रास देतो मला. पण तो चांगला मुलगा आहे, असं म्हणत आलिया हसली. त्यानंतर आलियाने त्या महिलेची नीट विचारपूस करत त्यांना काळजी घेण्यास सांगितले. आलियाने पापाराझींच्या आईशी केलेल्या प्रेमळ वागण्याने तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.
कामाबद्दल बोलायचे झाले तर आलिया भट्टच्या लवकरच करण जोहरच्या चित्रपटात रणवीर सिंगसोबत पुन्हा एकदा दिसणार आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी या नावाचा हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. त्याचबरोबर धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांसारखे दिग्गज कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. याशिवाय आलियाही हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनेत्री हार्ट ऑफ स्टोनमध्ये दिसणार आहे.
View this post on Instagram