आलियाने नेसली चक्क झेंडुच्या फुलांची साडी; सिद्धिविनायक मंदिरात अर्पण केलेल्या फुलांपासून बनवली साडी, किंमत ऐकून थक्क व्हाल
आलिया तिच्या आणखी एका साडीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आलियाने दिवळीला नेसलेली साडी ही चक्क झेंडूंच्या फुलांपासून बनवलेली आहे. सिद्धिविनायक मंदिरात अर्पण केलेल्या फुलांपासून ही साडी बनवण्यात आली आहे, या साडीची किंमत ऐकूनच तुम्ही थक्क व्हाल.

आलिया भट्टचे दिवाळी फोटो बरेच चर्चेत राहिले होते. लेक राहा आणि रणबीरसोबत आलियाने मॅचिंग असे आउटफिट घातले होते. पण तुम्हाला माहितीये का की आलियाची ही साडी चक्क झेंडूंच्या फुलांपासून बनवलेली आहे. सिद्धिविनायक मंदिरात अर्पण केलेल्या फुलांपासून ही साडी बनवण्यात आली आहे.
आलियाचे आउटफिट पुन्हा चर्चेत
आलिया भट्ट एकदा घातलेलं आउटफिट हे पु्न्हा वापरताना किंवा घालताना दिसते. रुपेरी पडद्याप्रमाणे आलिया खऱ्या आयुष्यात सुद्धा तेवढीच ग्लॅमरस आहे.पण तरीही ती तिचे एकदा घातलेले कपडे नक्कीच वेगवेगळ्या कार्यक्रमांना पुन्हा वापरताना दिसते आणि त्यामुळे तिच्या आउटफिटची चर्चा तर होते पण सोबतच तिचं कौतुकही होतं.
- Alia Bhatt’s Eco-Friendly Saree
आता आलिया तिच्या आणखी एका साडीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दिवाळीला आलियाने गोल्डन रंगाची साडी नेसली होती. अभिनेत्रीच्या प्लेन साडीवर हलकीशी डिझायनर बॉर्डर होती. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की ती साडी चक्क झेंडूच्या फुलांपासून बनवली आहे आणि तेही सिद्धिविनायक मंदिरात अर्पण केलेल्या फुलांपासून बनवण्यात आली आहे.
82 हजार 500 रुपयांची झेंडूच्या फुलांची साडी
आलियाने नेसलेली ही साडी अमी पटेलने डिझाइन केलेली आहे. ही अतीव आनंद यांच्या रि-सेरेमोनिअल ब्रँडची साडी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात अर्पण केलेल्या झेंडुच्या फुलांचा पुनर्वापर करून रंगवली आहे. मंदिरात दररोज जमा होणाऱ्या फुलांचा पुनर्वापर करून पर्यावरणपूरक पद्धतीने या साड्या बनवल्या जातात. रिपोर्टनुसार आलियाच्या या साडीची किंमत तब्बल 82 हजार 500 रुपये आहे.
- Alia Bhatt’s Eco-Friendly Saree
दरम्यान आलियाने या साडीवर सोनेरी रंगाचा स्लीव्हलेस ब्लाउज घातला होता. तर, लेक राहा अन् रणबीरने सुद्धा तिला मॅचिंग असे कपडे घातले होते. आलिया तसे तिचे आउटफिट नक्कीच पुन्हा वापरताना दिसते . जसं की तिने तिच्या लग्नाची साडी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर पुन्हा एकदा नेसली होती. तर, मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत देखील तिने तिचा हळदी व संगीत समारंभाचा ड्रेस पुन्हा एकदा घातला होता.
- Alia Bhatt’s Eco-Friendly Saree
दरम्यान, आलिया भट्ट नुकतीच ‘जिगरा’ चित्रपटात झळकली होती. आता येत्या काळात अभिनेत्री ‘अल्फा’ या यशराजच्या स्पाय युनिव्हर्समधील पहिला स्त्री-प्रधान चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात आलियाबरोबर मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ झळकणार आहे.