Alicia Breuer : व्हिडीओ शेअर करत लाखोंची कमाई, अनेक मोठ्या ब्रँड्ससोबत डील, कमाईचा फंडा काय?
: सध्या सोशल मीडिया हे असं माध्यम आहे इथं कोणत्याही व्यक्तीचं आयुष्य रात्रभरात बदलू शकतं. (Alicia Breuer: Making Millions By Sharing Videos, Deals With Many Big Brands, What Is The Money Fund?)
मुंबई : सध्या सोशल मीडिया (Social Media) हे असं माध्यम आहे इथं कोणत्याही व्यक्तीचं आयुष्य एका रात्रभरात बदलू शकतं. अशी बरीच उदाहरणं आहेत जे लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो रुपये कमवतात. सोशल मीडियावर सक्रिय राहून पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. गेल्या पाच वर्षांत या गोष्टीकडे लोकांचा कल प्रचंड वाढला आहे.
इन्स्टाग्राम आणि फेसबुक प्रचंड प्रभावी
या बाबतीत ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुक प्रचंड प्रभावी आहेत. इतरांसमोर स्वत:ला वेगळ्या अंदाजात सादर करणारे असे अनेक लोक तुम्ही पाहीले असतील. सोबतच असेही लोक आहेत की जे स्वत:ला इतरांसमोर अगदी विचित्र पद्धतीनं सादर करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, जी लिप-सिंक करून लाखोंची कमाई करते.
पाहा व्हिडीओ (Alicia Breuer’s Videos)
View this post on Instagram
एका दिवसात मिळवते लाखो रुपये
या व्यक्तीच्या उत्पन्नाचं मुख्य स्त्रोत टिकटॉक आहे. जिथं ती लिप-सिंक करत व्हिडीओ शेअर करुन कोट्यवधी रुपये मिळवले जातात. इंग्रजी वेबसाइट मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 17-वर्षीय अॅलिसिया ब्रेवरनं (Alicia Breuer) 2020 च्या लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान वेळ घालवण्यासाठी अॅप डाऊनलोड केलं आणि एका वर्षाच्या आतच तिनं अॅप्सवर लिप-सिंक व्हिडीओ शेअर करत मोठी रक्कम मिळवली आहे.
पुढील शिक्षण थांबविलं
माध्यमांशी बोलताना , अॅलिसियानं सांगितलं की, तिनं व्हिडीओंच्या सहाय्यानं दररोज 10,000 पौंड मिळवले आहेत. तर ही रक्कम भारतीय चलनात एक लाखाहून अधिक आहे. अॅलिसिया पुढे म्हणाली की तिला Lancome, अर्बन आउटफिटर्स, बूहू आणि फिन्टी सारख्या ब्रँडच्या ऑफर्सही मिळाल्या आहेत. त्यामुळे, तिने आता आपलं पुढील शिक्षण थांबविलं आहे.
संबंधित बातम्या