तुझ्या अफेअरची उघड चर्चा कशाला ? नवाजुद्दिन सिद्दीकीवर भडकली आलिया
आपल्या असंख्य प्रेमप्रकरणांबद्दल चारचौघांत टीक करण्याबद्दल आलिया सिद्दीकीने तिचा माजी पती आणि अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याला फटकारले आहे.
Aliya Siddiqui On Nawazuddin Siddiqui : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) व त्याची माजी पत्नी आलिया सिद्दीकी (Aliya siddiqui) यांच्यातील वाद जगजाहीर आहे. आलिया ही नुकतीच बिग बॉस ओटीटी 2 मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. मात्र तिचा या शोमधील प्रवास अत्यल्प काळासाठी होता. अवघ्या काही दिवसांतच ती या शोमधून आऊट झाली. बाहेर आल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत आलिया ही नवाजुद्दीनवर भडकलेली दिसली. आपल्या असंख्य अफेअर्स, प्रेमप्रकरणांबद्दल (नवाजुद्दीनने) चर्चा करणे अयोग्य असल्याचे ती म्हणाली. यामुळे त्यांच्या टीनएजर मुलीवरही परिणाम होऊ शकतो, अशा शब्दांत आलियाने सुनावले आहे.
नवाजुद्दीन याने आपल्या चरित्रात, न्यूयॉर्कमधील त्याच्या वन-नाइट स्टँडबद्दल, तसेच अभिनेत्री निहारिका सिंगबद्दलही सांगितले होते. मिस लवलीमध्ये त्याच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीने नंतर त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले.
नवाजुद्दीन वर आलियाचा निशाणा
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आलिया म्हणाली की, नवाजुद्दीनने त्याच्या आयुष्यातील या सर्व गोष्टी उघड करणे योग्य नाही. अनेक प्रसिद्ध यशस्वी लोकांचे इतर महिलांशी प्रेमसंबंध असतात, पण ते त्याबद्दल काही बोलत नाहीत, स्वतःपुरतच ठेवतात, असे ती म्हणाली. आमची मुलगी आता टीनएजर आहे आणि वडिलांबद्दलच्या अशा गोष्टी ऐकून तिच्या मनावर परिणाम होऊ शकतो, असेही तिने नमूद केले. अशावेळी नवाजुद्दिनने पिता म्हणून जास्त जबाबदारपणे वागले पाहिजे, असेही ती म्हणाली.
नवाजची विभक्त पत्नी आलिया ही सुनीता राजवारबद्दलही बोलली आहे. तो तिच्या सोबत रिलेशनमध्ये होता. वैयक्तिक आयुष्यातील तपशीलांमुळे सुनीताचे खूप नुकसान झाल्याचेही सुनिताने सांगितले. तो स्ट्रगलर होता म्हणून नव्हे तर त्याच्या विचारसरणीमुळे मी त्याला (नवाजुद्दीनला) सोडले, असे सुनीताने स्पष्ट केले, होते.
बॉयफ्रेंडसोबत खुश आहे आलिया
आलिया तिच्या इटालियन बॉयफ्रेंडबद्दलही बोलली, त्याच्यासोबत खूप आनंदी असल्याचेही तिने नमूद केले. कामाबाबत सांगायचे झाले तर नवाजुद्दीन शेवटचा अवनीत कौरच्या विरुद्ध ‘टिकू वेड शेरू’मध्ये दिसला होता. या चित्रपटाची निर्मिती कंगना राणौतने केली होती. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला.