Alka yagnik Birthday Special: तिने 2 हजार गाणी गायली पण 27 वर्ष नवऱ्यापासून वेगळी राहिली, का? जाणून घ्या अलका याज्ञिक विषयी सर्व काही…
Alka yagnik Birthday Special : फक्त बॉलीवुडच नाही तर 16 भाषांमध्ये गाणं गायलेल्या सिंगर अलका याज्ञिक यांचा आज 55 वा वाढदिवस. बॉलिवुडचं यश पाहिलेली गायिका म्हणून अलकांची ओळख आहे.
मुंबई : फक्त बॉलीवुडच नाही तर 16 भाषांमध्ये गाणं गायलेल्या सिंगर अलका याज्ञिक (Alka yagnik ) यांचा आज 55 वा वाढदिवस. बॉलिवुडचं यश पाहिलेली गायिका म्हणून अलकांची ओळख आहे. पण हेच यश मिळवण्यासाठी जीवन किती खडतरपणे जगावं लागलं तेही महत्वाचं आहे. (Alka yagnik married life facts know her husband)
अलका याज्ञिक यांचं तपश्चर्यने घडलेलं करिअर
अलका याज्ञिक यांनी वयाच्या 14 व्या वर्षी म्युझिक इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. प्यार की झंकार, ‘मेरे अंगने मे’ सारखे सुरुवातीला हिट गाणे दिले. आज घडीला जवळवास 2 हजार गाणी त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी फक्त हिंदीच नाही तर 16 वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायलीत. पण सुपरहिट असलेलं पहिलं गाणं होतं, तेजाबमधलं ‘एक दोन तीन…’. याच गाण्यावर माधुरी दिक्षितने काही पिढ्यांना भुरळ पाडली. अलका याज्ञिक यांनाही पहिलं फिल्मफेअर याच गाण्यासाठी मिळालं. पण या यशाच्या पाठीमागे काही खडतर निर्णय आहेत.
View this post on Instagram
लग्न आणि दुरावा
अलका याज्ञिक ह्या कोलकात्याच्या. एका गुजराती कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरात संगिताचं वातावरण होतं. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्या भजन किर्तन गायच्या. नंतर बॉलिवुडमध्ये चांगलं बस्तान बसवलं. 1989 ला त्यांनी उद्योगपती नीरज कपूर यांच्याशी लग्न केलं. नीरज हे शिलॉंगचे. पण लग्न करुनही दोघांना एक नाही दोन नाही तर 27 वर्ष एकमेकांपासून दूर रहावं लागलं.
View this post on Instagram
नवऱ्यापासून का रहावं लागलं 27 वर्ष दूर
सध्याचा काळ हा लाँग डिस्टन्सिंग रिलेशनशिपचा आहे. पण ज्या काळात अलका याज्ञिक नवऱ्यापासून एवढ्या मोठा काळ दूर राहिल्या तेव्हा अशा संबंधांचा फार बोलबाला नव्हता. अलका याज्ञिक यांचे पती नीरज कपूर हे शिलाँगला बिजनसमॅन होते. त्यांचा सगळा व्यवसाय तिथेच होता. अलका याज्ञिकांना मुंबईत रहावं लागायचं. कारण त्यांचं काम, गाणं सगळं मायानगरीत होतं. अलकासाठी मुंबईत येऊन नीरज कपूर यांनी व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आलं नाही. शेवटी अलका यांच्याच सांगण्यावरून ते परत शिलाँगला गेले आणि तिथंच व्यवसाय केला. अधूनमधून ते मुंबईत यायचे. अशा पद्धतीनं त्यांना 27 वर्ष एकमेकांसोबत लग्न होऊनही लाँग डिस्टन्स रिलेशिनशिपमध्ये रहावं लागलं. अलका याज्ञिक यांनी मुलांचा एकहाती सांभाळ केला.
(Alka yagnik Birthday Special Alka married life facts know her husband)