‘पुष्पा 2’ ला मोठा फटका, रिलीज झाल्यानंतर काही तासांतच ऑनलाईन लीक?; कमाईवर परिणाम होणार?

Pushpa 2 Leaked: ‘पुष्पा 2: द रूल’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही तासांतच ऑनलाईन लीक झाला आहे. चित्रपटाच्या टीमनेही या कृत्यांवर कारवाई केली असून ते सर्व व्हिडिओ कॉपीराईट अंतर्गत सोशल मीडियावरून काढून टाकण्यात येत आहेत.

'पुष्पा 2' ला मोठा फटका, रिलीज झाल्यानंतर काही तासांतच ऑनलाईन लीक?; कमाईवर परिणाम होणार?
पुष्पा 2 लीक ?Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 05, 2024 | 4:39 PM

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर ‘पुष्पा 2: द रूल’ आज रिलीज झाला असून अनेकांना तो पाहण्याची उत्सुकता आहे. मात्र प्रदर्शित झाल्यावर काही तासांतच या चित्रपटाला मोठा झटका बसला आहे. कारण रिलीज झाल्यानंतर काही वेळातच हा पिक्चर ऑनलाईन लीक झाला आहे. या चित्रपटाच्या तिकिटाची किंमत गगनाला भिडलेली असताना काही वेबसाईटवर मोफत उपलब्ध झाल्याने चित्रपटाचे नुकसान होऊ शकते. दरम्यान, हा चित्रपट काही वेबसाईटवर लीक झाल्याची माहिती आहे.

‘पुष्पा’च्या अ‍ॅक्शनने सिनेरसिकांना इतकी भुरळ घातली की त्याच्या अनेक क्लिप्स सोशल मीडियावर बेछूट शेअर केल्या जात होत्या. पुष्पा राजच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा अल्लू अर्जुन यावेळीही अप्रतिम कामगिरी केली आहे. पुष्पाची पत्नी श्रीवल्लीच्या भूमिकेत रश्मिका मंदानाने देखील पुनरागमन केले आहे. पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तीन वर्षांनी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर उतरला आहे. या चित्रपटाचे मोठ्या थाटामाटात स्वागतही केले जात आहे. चित्रपटगृहांपासून सोशल मीडियापर्यंत लोक या चित्रपटाची चर्चा करत आहेत.

सकाळी 8 वाजेपर्यंत या चित्रपटाने 21.04 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पुष्पा 2 ऑनलाईन लीक

‘पुष्पा 2: द रूल’ हा चित्रपट लॉन्च होताच लीक झाला आहे. हा चित्रपट अनेक पायरसी वेबसाईट्सवर लीक झाला आहे.

‘पुष्पा 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक सुकुमार यांनी केले आहे. सुकुमार यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या चित्रपटांनी नेहमीच धुमाकूळ घातला आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक सुकुमार यांचा प्रत्येक चित्रपट लोकांच्या हृदयात आपलं खास स्थान निर्माण करतो. सुकुमार यांनी यापूर्वी अल्लू अर्जुनसोबत 3 चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि प्रत्येक वेळी अल्लू अर्जन सुकुमार यांच्यासाठी भाग्यवान किंवा खासच ठरला आहे.

बंगाली भाषेत प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट

‘पुष्पा 2: द रूल’ हा चित्रपट तमिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड, बंगाली आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. बंगाली भाषेतही प्रदर्शित होणारा हा पहिलाच अखिल भारतीय चित्रपट आहे. हा स्मार्टफोन स्टँडर्ड, 3D, IMAX, 4DX आणि D-BOX फॉरमॅटमध्ये रिलीज करण्यात आला आहे.

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.