“हे सगळं तुझ्यासाठी”; हे शब्द ऐकताच अल्लू अर्जूनच्या डोळ्यात पाणी, लाखो चाहत्यांसमोर पुष्पा भावूक

'पुष्पा २: द रूल' चित्रपटाच्या रिलीजची उत्सुकता सर्वत्र आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये मिळालेल्या प्रतिसादामुळे चित्रपट मोठ्या कमाईची आशा निर्माण करतो. हैदराबादमध्ये एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये अल्लू अर्जुन भावूक झाला असून त्याला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळालं.

हे सगळं तुझ्यासाठी; हे शब्द ऐकताच अल्लू अर्जूनच्या डोळ्यात पाणी, लाखो चाहत्यांसमोर पुष्पा भावूक
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 5:39 PM

बुहिप्रतिक्षित चित्रपच ‘पुष्पा 2: द रुल’ 5 डिसेंबरला रिलीज होतोय. सर्व प्रेक्षकांनी चित्रपटाची प्रंचड उत्सुकता आहे शिवाय या चित्रपटाकडून अपेक्षाही खूप आहे. चित्रपट रिलीजी होण्याआधीच त्याची होत असेलली अॅडवान्स बुकींग पाहाता चित्रपट रिलीजनंतर धुमाकूळ घालणार असल्याचे दिसते. चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटाची टीम प्रमोशन करत आहे. अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना सर्वत्र प्रमोशन करत संपूर्ण देशाचा दौरा त्यांनी केला आहे.

प्रत्येक शहराने अल्लू अर्जून आणि रश्मिकाचे जंगीच स्वागत केले आहे. नुकताच हैदराबादमध्ये चित्रपटाचा प्रमोशनल इव्हेंट झाला. या कार्यक्रमावेळी अल्लू अर्जुन भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक त्यांचे मनोगत व्यक्त करताना दिसले.

कार्यक्रमात ‘पुष्पा 2: द रुल’चे दिग्दर्शक सुकुमार यांनी सरळ्यांसमोर अल्लू अर्जुनचे तोंड भरून कौतुक केले. हे ऐकून अल्लू अर्जुन इतका भावूक झाला की त्याला अश्रू अनावर झाले. सुकुमार अल्लू अर्जुनचे कौतुक करताना म्हणाले, की,‘‘एक गोष्ट निश्चित आहे: माझा प्रवास आर्यापासून सुरू झाला. मी बनीला वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करून पुढे जाताना पाहिले आहे, त्याची मेहनत जवळून पाहिली आहे. आज पुष्पा ज्या ठिकाणी आहे तर ते अल्लू अर्जुनवरील माझ्या प्रेमामुळे आहे. तो अगदी छोट्या छोट्या एक्सप्रेशन्ससाठीही लढतो आणि हीच माझी ऊर्जा आहे. अल्लू अर्जुन, हा चित्रपट मी तुझ्यासाठी बनवला आहे.’’

पुढे ते म्हणाले- ‘‘जेव्हा मी पहिल्यांदा तुझ्याशी संपर्क साधला तेव्हा माझ्याकडे पूर्ण कथा नव्हती, फक्त दोन ओळी होत्या. तुझ्या समर्पणाने मला विश्वास दिला की आपण काहीही साध्य करू शकतो. अल्लू अर्जुन, हे तुझ्यासाठी आहे.’’ चाहत्यांना संबोधित करत ते म्हणाले, ‘‘मला पुष्पा 3 बद्दल सांगायचे आहे, मी पुष्पा 2 साठी तुमच्या हिरोला त्रास दिला, आणि जर त्याने मला आणखी तीन वर्षे दिली तर मी पुष्पा 3 नक्की बनवेन.’’ सुकुमार यांनी केलेले कौतुक ऐकून अल्लू अर्जुन भावूक झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले . त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

‘पुष्पा 2’ ची संपूर्ण देशाला प्रतिक्षा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून चित्रपटाने मोठी कमाई केली आहे. तसेच हा चित्रपट 2D, 3D, IMAX आणि 4DX फॉरमॅटमध्ये प्रदर्शित होणार आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.