यंदा कर्तव्य आहे…! परिणिती-राघवच नव्हे, या सेलिब्रिटींचंही ‘दिल मिल गये…’, रिलेशनशिपची चर्चा जोरात सुरू !
Bollywood Couples Romance : राघव चढ्ढा आणि परिणिती चोप्रा यांचा साखरपुडा झाल्याची चर्चा होत असून ऑक्टोबर महिन्यात ते लग्न करणार असल्याचे समजते. पण परिणिती शिवाय बॉलिवूडमधील असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्या प्रेमाची जोरदार चर्चा आहे.

मुंबई : 2023 या वर्षाच्या सुरुवातीलाच क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टीचे भव्य लग्न सर्वांना पाहायला मिळाले. आता अशा बातम्या येत आहेत की, इंटरनॅशनल स्टार प्रियांका चोप्राची धाकटी बहीण आणि अभिनेत्री परिणीती चोप्रानेही (Pariniti Chopra) तिचा जीवनसाथी निवडला आहे. आम आदमी पक्षाचे राजकारणी राघव चढ्ढा (Raghav chaddha) यांच्याशी तिचा साखरपुडा झाल्याची चर्चा होत असून ऑक्टोबर महिन्यात ते लग्न करणार असल्याचे समजते. पण परिणिती शिवाय बॉलिवूडमधील असे अनेक सेलिब्रिटी (celebrity) आहेत, ज्यांच्या प्रेमाची जोरदार चर्चा आहे. ती कपल्स कोणती ज्यांच्या रोमान्सची (couple who can tie knot this year) चर्चा सुरू आहे, ते जाणून घेऊया.
1) आदित्य रॉय कपूर-अनन्या पांडे
सध्या परिणीतीशिवाय बॉलिवूडमध्ये ज्या कपलची सर्वाधिक चर्चा होत आहे ती म्हणजे अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री अनन्या पांडे. दोघेही बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच वेळा एकत्र स्पॉट होत आहेत. कधी ते कॅज्युअल लूकमध्ये दिसतात तर कधी मोठ्या इव्हेंटमध्ये एकत्र रॅम्पवर चालताना दिसतात. दोघांची जवळीक नाकारता येत नाही. 2023 मध्ये दोघेही त्यांच्या नात्याला नवं वळण देऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे.
View this post on Instagram
2) विजय देवरकोंडा -रश्मिका मंदान्ना
पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली अर्थात रश्मिका मंदान्ना हिचे नाव 2023 च्या सुरुवातीपासून दक्षिणेतील अर्जुन रेड्डी अर्थात विजय देवरकोंडा याच्याशी जोडले गेले आहे. दोघांची जोडी चाहत्यांनाही आवडते. दोघांनी एकत्र स्क्रीनही शेअर केली आहे. रश्मिका आणि विजय वाढदिवसालाही एकत्र होते.
3) जाह्नवी कपूर-शिखर पहाड़िया
जान्हवी कपूरला इंडस्ट्रीत येऊन फार काळ लोटला नाही, मात्र अभिनेत्रीच्या प्रेमाच्या चर्चाही रंगत आहेत. शिखर पहारियासोबत ती लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या येत आहेत. शिखर राजकीय पार्श्वभूमीतून आलेला असून तो व्यवसायाने पोलो खेळाडू आहे.
View this post on Instagram
4) तमन्ना भाटिया-विजय वर्मा
दाक्षिणात्य चित्रपटांसह बॉलिवूडमध्येही दिसणारी सुंदर अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा या दोघांच्या नात्याचीही बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. गेल्या काही काळापासून ते दोघं अनेकदा एकत्र दिसले आहेत. या दोघांच्या जवळीकींमुळे दोघेही लग्न करू शकतात अशी चर्चा बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये वाढली आहे. दोघांचे एकत्र फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये दोघांचे क्यूट बाँडिंग पाहून चाहते एकच विचारत आहेत- तुम्ही लग्न कधी करणार आहात?
5) सुरभि ज्योति- रित्विक धनजानी
एक काळ असा होता की पवित्र रिश्ता फेम ऋत्विकचे प्रेमप्रकरण त्याची सहकलाकार आशा नेगीसोबत असायचे. पण आता ती भूतकाळातील गोष्ट झाली आहे. आता ऋत्विक धनजानी आणि सुरभी ज्योती यांच्यातील रोमान्सच्या बातम्या येत असतात. दोघेही टीव्हीच्या दुनियेतील मोठे नाव असून येणाऱ्या काळात त्यांच्याबद्दलही बरीच चर्चा सुरू आहे.