मुंबई | 29 डिसेंबर 2023 : देसिया मुरपोक्कू द्रविड कळघमचे (डीएमडीके) संस्थापक आणि अभिनेते विजयकांत यांचं निधन झाल्याची माहिती गुरुवारी समोर आली. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण आता विजयकांत यांच्या निधनाबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. विजयकांत यांचं निधन झालं नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे… असा दावा दिग्दर्शक अल्फोंस पुथ्रेन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
उदयनिधि स्टालिन यांचा उल्लेख करत दिग्दर्शकाने धक्कादायक दावा केला आहे. दिग्दर्शक अल्फोंस पुथ्रेन म्हणाले, ‘इंडस्ट्रीच्या दिग्गज आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललीता आणि एम.करुणानिधी यांची हत्या करण्यात आली. ‘इंडियन 2’ च्या सेटवर कमल हासन आणि तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना मारण्याचा प्रयत्न केला. मारेकऱ्यांचे पुढील लक्ष्य एमके स्टॅलिन किंवा उदयनिधी स्टॅलिन असल्याचंही पुथ्रेन म्हणाले.. असे धक्कादायक दावे करत पुथ्रेन यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Alphonse Puthren Status !!#Captain #CaptainVijaykanth #RIPCaptain pic.twitter.com/CzXClcoZKQ
— Vignesh (@Vignesh58Viki) December 28, 2023
अल्फोंस पुथ्रेन पुढे म्हणाले, ‘जर तुम्ही आता गुन्हेगारांचा शोध घेणार नाहीत, तर गुन्हेगारांच्या निशाण्यावर तुम्ही असाल… नेरम सुपरहिट होण्यासाठी तुम्ही मला भेट दिली होती… हे मला आठवत आहे. तुम्ही आयफोन सेंटरला कॉल केला आणि मला काळ्या रंगाचा आयफोन भेट म्हणून दिला. तुम्हाला उदयनिधी अण्णा आठवतील अशी आशा आहे. तुमच्यासाठी गुन्हेगार आणि त्यांचा हेतू शोधणं सोपं आहे. दिग्दर्शकाची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अभिनेते विजयकांत यांच्या कोव्हिड चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली होती. एवढंच नाही तर, त्यांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात असं देखील सांगण्यात आलं होतं. त्यांच्या निधनावर सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. पण आता अल्फोंस पुथ्रेन यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.